अमरावती : राज्यात सध्या राजकीय घडामोडींना चांगलाचं वेग आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर इडीने कारवाई केली असून त्यांची अलिबागजवळील जमीन आणि दादर येथील फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. यावर भाजपच्या काही नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच आता भाजपचे नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांना न्यायालयाने शिक्षा ठोठवली आहे.
राज ठाकरे साहेबांवर नाराज नाही, पण भूमिका काय घ्यावी, समजत नाही? वसंत मोरे
अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने अनिल बोंडे यांना तीन महिन्यांचा कारावास आणि 20 हजार रूपायांचा दंड ठोठवला आहे. त्यांच्यावर वरूडच्या नायब तहसिलदारांना मारहाण केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2017 साली त्यांनी वरूडचे नायब तहसिलदार नंदकिशोर काळे यांच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ केली होती.
वरुडच्या नायब तहसिलदारांना मारहाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासासह २० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अनिल बोंडे यांना न्यायालयाने हा दणका दिल्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
शिवसेनेचे 18 खासदारांपैकी 14 खासदार आमच्या संपर्कात; प्रसाद लाड यांचा दावा
दरम्यान, अलिकडेच अनिल बोंडे यांनी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी देखील अपमानकारक भाषा वापरली होती. तेव्हा देखील त्यांच्यावर माझगाव महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्यांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवले होते. या प्रकरणी नागपुर पुर्व मतदारसंघाचे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे, भाजयुवामो जालनाचे जिल्हाध्यक्ष सुजित जोगस हे देखील याप्रकरणात आरोपी आहेत.
Read also:
- “संजय राऊत हे धुतल्या तांदळाचा माणूस नाही”; इडीच्या कारवाईनंतर निलेश राणेंची प्रतिक्रिया
- “माझ्या हत्येचा हिरेन पांड्या करण्याचा संबंधितांचा प्लॅन”; इडीच्या कारवाईनंतर राऊतांचा गंभीर आरोप
- त्यांची मानसिक तयारी होती तर..; इडीने राऊतांवर केलेल्या कारवाईवर भाजप नेत्यांची प्रतिक्रिया
- इडीचा संजय राऊतांना मोठा दणका; अलिबागजवळील जमीन, दादरमधील फ्लॅट जप्त
- शिवसेनेचे खासदार राष्ट्रवादीवर नाराज; दिल्लीतील बैठकीत महाविकास आघाडीत ‘बिघाडी’