मुंबई : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यांची अलिबाग येथील जमीन आणि दादर येथील फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापण्याची शक्यता आहे. ईडीच्या कारवाईनंतर अशातच आता संजय राऊत यांनी मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, अशा कारवाईने मी किंवा शिवसेना खचणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर भाजप नेते निलेश राणे यांनी देखील यावर भाष्य केलं आहे.
निलेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, संजय राऊत हा धुतल्या तांदळाचा माणूस नाही. आयकर विभागाचे 55 लाख संजय राऊत यांनी चोरले आहेत. त्यांनी परत केले, पंरतु चोरी केले होते म्हणून ते परत केले. माणसाला चोरी करायची सवय लागली तर तो माणूस इथून तिथून जमवतो. जसे ते बोलतात. तसे करायला गेले असतील ते आणि त्यात सापडले असतील. सगळ्यात जास्त आनंद भाजपला झाला आहे, असा आरोप ते आमच्यावर केला जात आहे. परंतु आम्ही त्यांना कुठलीही किंमत देत नाही.
शिवसेनेचे 18 खासदारांपैकी 14 खासदार आमच्या संपर्कात; प्रसाद लाड यांचा दावा
संजय राऊत स्वत:फार जास्त महत्व देतात आणि तीच त्यांची काम करण्याची पद्धत आहे. ते समजाला सांगतात की माझी किंमत मोठी आहे. परंतु त्यांची किंमत खरी शुन्य आहे. त्यांना कुणी निलकटरने देखील कुणी मारणार नाही. संजय राऊत यांच्याबद्दल कोणालाही माहिती नाही. सकाळी येऊन फक्त मनोरंजन करत असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे.
कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही; रिपाइंची राज ठाकरेंविरोधात कारवाई करण्याची मागणी
दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिवसांतून तीन वेळा नोटीसा येतात. मग त्यांच्यावर कुणाचा दवाब आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. ते पत्रकार परिषद घेऊन फक्त बडबड करीत असतात. त्यांच्याजवळ पुरावे असतील, त्यांनी ते न्यायालयात सादर करावेत, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Read also:
- “माझ्या हत्येचा हिरेन पांड्या करण्याचा संबंधितांचा प्लॅन”; इडीच्या कारवाईनंतर राऊतांचा गंभीर आरोप
- त्यांची मानसिक तयारी होती तर..; इडीने राऊतांवर केलेल्या कारवाईवर भाजप नेत्यांची प्रतिक्रिया
- इडीचा संजय राऊतांना मोठा दणका; अलिबागजवळील जमीन, दादरमधील फ्लॅट जप्त
- शिवसेनेचे खासदार राष्ट्रवादीवर नाराज; दिल्लीतील बैठकीत महाविकास आघाडीत ‘बिघाडी’
- राज ठाकरे साहेबांवर नाराज नाही, पण भूमिका काय घ्यावी, समजत नाही? वसंत मोरे