मुंबई : गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा पाठिमागे लागला आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. त्यांची अलिबाग येथील मालमत्ता इडीने जप्त केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंचा मशिदीवरील भोंग्यांना विरोध; पुण्यात वसंत मोरेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
अलिकडेच संजय ऱाऊत यांच्या मुलीचं लग्न पार पाडलं. त्यावेळी त्या लग्नात मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचा आरोप भाजपच्या काही नेत्यांनी केला होता. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबांची ईडीकडून चौकशी देखील करण्यात आली होती. त्यामुळे अशातच आता अलिबागमधील जमीन आणि मुंबईतील एक फ्लॅट जप्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय. भाजप नेते किरीट सोमय्या याबाबत पत्रकार परिषद घेऊन् माहिती देणार आहेत.
कोल्हापूरात राजकीय आखाडा तापला; प्रचारासाठी मैदानात उतरली युवा नेत्यांची फौज
संजय राऊत यांची अलिबागजवळील किहीमधील 8 भुखंड जप्त करण्यात आलं आहे. तसेच ईडीने 1 हजार 48 कोटींच्या प्रविण राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे. संजय राऊतांचे स्नेही प्रविण राऊत यांनी घोटाळा केला आहे. यामध्ये संजय राऊत हे देखील सहभागी आहेत. त्यांच्या पत्नीच्या खात्यात देखील पैसा आलं आहे. असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
“ते अज्ञान लोक पंपावर पळून गेले की कदमवाडीला?”; सतेज पाटलांचा भाजपला खोचक सवाल
दरम्यान, ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी सत्यमेव जयते असं म्हटलं आहे. गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील अनेक राजकीय नेत्यांवर ईडीने कारवाई केॆली आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर आगामी काही काळातील राजकीय वातावरण कसं असणार ते आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- शिवसेनेचे खासदार राष्ट्रवादीवर नाराज; दिल्लीतील बैठकीत महाविकास आघाडीत ‘बिघाडी’
- राज ठाकरे साहेबांवर नाराज नाही, पण भूमिका काय घ्यावी, समजत नाही? वसंत मोरे
- “गुढीपाडव्याच्या सभेत फायरब्रॅंड नेत्याला काय झालं? रूपाली पाटलांची राज ठाकरेंच्या भाषणांवर प्रतिक्रिया
- शिवसेनेचे 18 खासदारांपैकी 14 खासदार आमच्या संपर्कात; प्रसाद लाड यांचा दावा
- कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही; रिपाइंची राज ठाकरेंविरोधात कारवाई करण्याची मागणी