पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीका करताना कट्टर हिंदुत्त्वाचा राग आळवला त्यानंतर मनसेत नाराजीचे सूर उमटायला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शवला. एवढेच नव्हे तर हे भोंगे हटवले नाहीत तर त्याच मशिदीसमोर स्पीकर्स लावून ‘हनुमान चालिसा’ लावा, असे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले. राज ठाकरे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मनसेचे राज्यभरातील मुस्लीम पदाधिकारी दुखावले गेल्याची चर्चा आहे. पुण्यात याचे पडसाद उमटायला सुरुवात झाले असून काही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकल्याची माहिती समोर आली आहे.
“शिवसेना म्हणजे राष्ट्रवादीची ‘ढ’ टिम”; आदित्य ठाकरेंच्या टिकेला मनसेचं प्रत्युत्तर
त्यामुळे आता मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी हालचाली करायला सुरुवात केली आहे. वसंत मोरे यांनी मनसेत कोणताही नाराजी नसल्याचा दावा केला आहे. मात्र, मंगळवारी पुणे शहर कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलवाण्यात आली आहे. या बैठकीत मनसेतील नाराज मुस्लीम पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न होईल, असे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुण्यातील मनसेचे काही नगरसेवकही राज ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराज असल्याची चर्चा आहे. यापैकी नगरसेवक साईनाथ बाबर यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, इतर नेते व पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेविषयी अद्याप संभ्रम आहे. पुणे शहर कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीनंतर मनसेत नक्की नाराजी आहे किंवा नाही, याचा उलगडा होऊ शकतो.
देशाला राहुल गांधींची गरज; ७८ वर्षीय महिलेने केली राहुल गांधींच्या नावे संपत्ती
पुणे शहरातील शाखा अध्यक्ष माजिद शेख यांच्यासह अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. माजिद शेख यांनी विभाग अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. तर येत्या काही दिवसात मनसेचे अनेक मुस्लिम पदाधिकारी राजीनामे देणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे यांनी मुस्लीम समाजाविरोधातील केलेल्या भाषणामुळे मुस्लिम समाज नाराज झाल्याने ही भूमिका पदाधिकारी घेत आहेत.
वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही अन्..; सभेत दगड फेकणाऱ्यांना चित्रा वाघ यांनी सुनावलं
‘राजसाहेबांनी जी ब्ल्यू प्रिंट आणली होती अन् ते म्हणाले होते मी शेतकरी जीन्स आणि टी-शर्ट मध्ये आणणार. त्यामुळे राजसाहेब माझे आदर्श होते अन् म्हणूनच मी पक्षात प्रवेश केला होता. पण आता राजसाहेबांनी राजकीय भूमिका बदलली आहे. म्हणून मी राजीनामा दिला आहे’, असे माजिद शेख यांनी स्पष्ट केले होते.
Read also:
- “ते अज्ञान लोक पंपावर पळून गेले की कदमवाडीला?”; सतेज पाटलांचा भाजपला खोचक सवाल
- “ते अज्ञान लोक पंपावर पळून गेले की कदमवाडीला?”; सतेज पाटलांचा भाजपला खोचक सवाल
- राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यांवर मुस्लिम समाज नाराज! पुण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
- “जो हिन्दू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा”; भाजप नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
- “शेण खाणारी राष्ट्रवादीची औलाद आमची नाही”; मनसेची राष्ट्रवादी, शिवसेनेवर जहरी टीका