पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील भाषणांमुळे राज्यात पुन्हा एकदा हिंदूत्वाचा मुद्दा समोर आला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. त्यामुळे त्यांच्यावर सध्या चहुबाजूंनी टीका करण्यात येत आहे. अशातच आता निलेश राणे यांनी राज ठाकरे आणि हिंदुत्वाबाबत महत्वपूर्ण भाष्य केले आहे. तर राज ठाकरे यांच्या याच भूमिकेकरून मनसेतच भूकंप झाल्याचे चित्र आहे. राज ठाकरे यांची ही भूमिका न पटल्याने आता पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरवात केली आहे.
काॅंग्रेसने कधीही जातीचं राजकारण केलं नाही; पाटलांच्या वक्तव्यांनी अनेकांच्या भुुवया उंचावल्या
पुणे शहरातील शाखा अध्यक्ष माजीद शेख यांच्यासह अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. मजीद शेख यांनी विभाग अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. तर येत्या काही दिवसात मनसेचे अनेक मुस्लिम पदाधिकारी राजीनामे देणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे यांनी मुस्लीम समाजाविरोधातील केलेल्या भाषणामुळे मुस्लिम समाज नाराज झाल्याने ही भूमिका पदाधिकारी घेत आहेत.
विरोधकांचा डाव पंतप्रधान इम्रान खाननं उधळून लावला; संसदेत न जाता थेट राष्ट्रपतीची घेतली भेट
“राजसाहेबांनी जी ब्ल्यू प्रिंट आणली होती अन् ते म्हणाले होते, मी शेतकरी जीन्स आणि टी-शर्ट मध्ये आणणार. त्यामुळे राजसाहेब माझे आदर्श होते अन् म्हणूनच मी पक्षात प्रवेश केला होता. पण आता राजसाहेबांनी राजकीय भूमिका बदलली आहे. म्हणून मी राजीनामा दिला आहे”. असं मजीद शेख यांनी म्हंटल आहे. 2009 पासून सच्चा मनसेचा सैनिक असणाऱ्या माजिद शेख यांनी राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर हा राज्यातील पहिलाच राजीनामा आहे. त्यामुळे यानंतर हिंदुत्वाकडे झुकणाऱ्या मनसेला मोठी गळती लागण्याची शक्यता आहे.
व्वा रं पठ्ठा…,काय बोलावं आता? अजित पवारांकडून खास दादा स्टाईलने राज ठाकरेंना प्रत्युत्तर
दरम्यान, शिवसेना राष्ट्रवादीसोबत जाऊन बाळासाहेबांचा विचार संपवत पक्षाची ओळख मिटवून बाळासाहेबांचा विचार राज ठाकरे पुढे घेऊन जात असेल तर नक्कीच त्यांचं स्वागत करू. बाळासाहेबांचे विचार कॉंग्रेस- राष्ट्रवादी सोबत संपवला जात असेल तर ते आम्हाला बघवणार नाही, असंही ते म्हणालेत.
Read also:
- “जो हिन्दू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा”; भाजप नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
- “शेण खाणारी राष्ट्रवादीची औलाद आमची नाही”; मनसेची राष्ट्रवादी, शिवसेनेवर जहरी टीका
- “शिवसेना म्हणजे राष्ट्रवादीची ‘ढ’ टिम”; आदित्य ठाकरेंच्या टिकेला मनसेचं प्रत्युत्तर
- देशाला राहुल गांधींची गरज; ७८ वर्षीय महिलेने केली राहुल गांधींच्या नावे संपत्ती
- वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही अन्..; सभेत दगड फेकणाऱ्यांना चित्रा वाघ यांनी सुनावलं