नवी दिल्ली : अलिकडेच पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकां पार पडल्या. यात निवडणुकांमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली. तर काॅंग्रेसने सगळ्या राज्यांमधून सपाटून मार खालला. त्यामुळे काॅंग्रेसच्या नेतृत्वाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच उत्तराखंडमधील एका महिलेनं आपली सगळी संपत्ती काॅंग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावावर केल्यानं त्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची तब्येत बिघडली; व्हिलचेअरवरून जे.जे. रुग्णालयात दाखल
उत्तराखंडमधील देहरादून याठिकाणी राहणाऱ्या 78 वर्षीय महिलेनं आपली संपत्ती राहुल गांधी यांच्यावर नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपत्तीमध्ये 50 लाखांची मालमत्ता आणि 10 तोळे सोनं अशी संपत्ती असल्याची माहिती समोर येत आहे. देहरादुनमधील रहिवासी पुष्पा मुंजियाल असं त्या महिलेचं नाव आहे. त्यांनी देहरादून न्यायालयात राहुल गांधी यांना मालकी हक्काचं मृत्यूपत्र सादर केल्याचं समजत आहे.
“मोदींमुळे देशात हिंदुत्वाची लाट; राज ठाकरेंचं आम्ही स्वागत करू”; भाजप नेत्याचं वक्तव्य
त्या महिलेने राहुल गांधी यांच्या नावावर संपत्ती करताना म्हटलं आहे की, आपल्यावर राहुल गांधी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे माझी सर्व संपत्ती राहुल गांधी यांच्या नावावर करत आहे. याबाबत काॅंग्रेसचे शहाराध्यक्ष लालचंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांच्या नावावरील मालमत्तेचे मृत्यूपत्र देखील माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांच्याकडे सोपवलं आहे. त्याचसोबत त्य़ा महिलेनं इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण देखील करून दिली आहे.
राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत, तो पर्यंत युती शक्य नाही; रावसाहेब दानवे
दरम्यान, राहुल गांधी यांच्या नावावर संपत्ती केल्याने त्या महिलेची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. तसेच आगामी काही काळात लोकसभेची निवडणुक देखील येत आहे. त्यामुळे राहुल गांधी तसेच काॅंग्रेस पक्ष प्रत्येक राज्यांमध्ये काॅंग्रेसला भरारी देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे उत्तराखंडमधील घडलेल्या घडनेवरून अनेक नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Read also:
- निवडणूका आल्या की माणसं रंग बदलतात; नितीन राऊत यांचा राज ठाकरेंना टोला
- निवडणूका आल्या की माणसं रंग बदलतात; नितीन राऊत यांचा राज ठाकरेंना टोला
- निवडणूका आल्या की माणसं रंग बदलतात; नितीन राऊत यांचा राज ठाकरेंना टोला
- अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही; मनसेकडून गृहमंत्र्यांना प्रत्युत्तर
- “बाळासाहेबांचे विचार काॅंग्रेस-राष्ट्रवादी सोबत शिवसेना संपवत आहे”; नितेश राणे