मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील भाषणांमुळे राज्यात पुन्हा एकदा हिंदूत्वाचा मुद्दा समोर आला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. त्यामुळे त्यांच्यावर सध्या चहुबाजूंनी टीका करण्यात येत आहे. अशातच आता निलेश राणे यांनी राज ठाकरे आणि हिंदुत्वाबाबत महत्वपूर्ण भाष्य केले आहे.
साहेबांच्या वारसदारांना संधी मिळाली पण..; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला
नितेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, भाजप हा देशात एव्हाना राज्यात हिंदुत्ववाला मोठं करणारा एकमेव पक्ष आहे. हे वेगवेगळ्या घटनांवरून वारंवार सिद्ध झाले आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने देशात हिंदुत्वाची लाट आलेली आहे. हिंदू राष्ट्र म्हणून आपला देश पुढे जात आहे. भाजपच्या विचारसरणीला पकडून कोणी येत असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करू. जर राज ठाकरे हे हिंदूत्ववाची भूमिका मांडत असेल तर त्यांचं देखील आम्ही स्वागत करू.असंही ते म्हणाले.
” असंतुष्ट आत्मांच्या छाताडावर बसून महापालिका जिंकणार”; संजय राऊतांची भीष्मप्रतिज्ञा
शिवसेना राष्ट्रवादीसोबत जाऊन बाळासाहेबांचा विचार संपवत पक्षाची ओळख मिटवून बाळासाहेबांचा विचार राज ठाकरे पुढे घेऊन जात असेल तर नक्कीच त्यांचं स्वागत करू. बाळासाहेबांचे विचार कॉंग्रेस- राष्ट्रवादी सोबत संपवला जात असेल तर ते आम्हाला बघवणार नाही, असंही ते म्हणालेत.
राज ठाकरेंना हाफचड्डीपासून ओळखतो, हा त्यांचा सिझनेबल कार्यक्रम
दरम्यान, शिवाजी पार्क येथे केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीयवाद फोफावला असल्याचं वक्तव्य केले होते. त्याचबरोबर त्यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचा इशारा दिला होता. तसेच त्यांनी हिंदूत्वाबाबत देखील सत्ताधारी पक्षांवर टोलेबाजी केली होती.
Read also:
- राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत, तो पर्यंत युती शक्य नाही; रावसाहेब दानवे
- भोंगा उतरवा म्हणणारे पहिले आपल्या बापाचे बाप होते; गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंना टोला
- पोलिसांनी दरेकरांविरोधात कारवाईचा फास आवळला; ‘बोगस मजूर’ प्रकरण भोवणार
- धनंजय तू बीडमध्ये मेळावा लाव मी येतो; मुलांच्या हातात कोयत्याऐवजी वही-पुस्तक देऊ; मुख्यमंत्री
- ऊसतोड कामगाराचा मुलगा सामाजिक न्यायमंत्री झालाय हे भाग्य; अजित पवार