मुंंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा टोकाचा संघर्ष पाहायला मिळताना दिसला आहे. शिवसेनेच्या मुंबईमधील नेत्यांच्या विरोधात भाजपच्या सांगण्यावरून ईडी, सीबीआयच्या धाडी टाकल्या जात असल्याची चर्चाही रंगली आहे. यावरून शिवसेनेने आक्रमक होऊन भाजपच्या काही प्रमुख नेत्यांना अडचणीत आण्यासाठी रणनीती आखली आहे.
मनसे भाजपची ‘सी’ टीम झाल्याचा आम्हाला आनंद; आदित्य ठाकरेंची मनसेवर खोचक टीका
विरोधीपक्षनेते आणि मुंबै जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर हे शिवसेनेच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आता वाढली आहे. ‘बोगस’ मजूर मतदार म्हणून प्रवीण दरेकर हे जिल्हा बँकेत कार्य करत आहेत अशी याचिका मागील काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने केली होती. या प्रकरणी आता प्रवीण दरेकरांना पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते.
वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही अन्..; सभेत दगड फेकणाऱ्यांना चित्रा वाघ यांनी सुनावलं
आज रमाबाई पोलीस ठाण्यात प्रवीण दरेकरांना पुन्हा चौकशीसाठी बोलविले असता त्यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावली आहे. लगेचच प्रवीण दरेकरांच्या चौकशीला सुरुवात झाली असल्याचे बोलले जाते आहे. प्रवीण दरेकरांची चौकशी सुरू झाल्याचे समजताच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर जमा झाले आहेत आणि घोषणाबाजी करत आहेत. प्रवीण दरेकरांची कसून चौकशी सुरु असून आता चौकशी नंतर काय बाहेर येणार ? याकडे सर्वंच राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. दरेकरांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचेही मत अनेकांनी मांडले आहे.
काॅंग्रेसने कधीही जातीचं राजकारण केलं नाही; पाटलांच्या वक्तव्यांनी अनेकांच्या भुुवया उंचावल्या
बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. याला आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकार विभागाने याची चौकशी करुन दरेकरांना अपात्र ठरवले होते. मजूर म्हणून प्रवीण दरेकर हे सदस्यत्वाला अपात्र असल्याचे सहकार विभागाने म्हटले होते.
Read also:
- नंजय तू बीडमध्ये मेळावा लाव मी येतो; मुलांच्या हातात कोयत्याऐवजी वही-पुस्तक देऊ; मुख्यमंत्री
- ऊसतोड कामगाराचा मुलगा सामाजिक न्यायमंत्री झालाय हे भाग्य; अजित पवार
- साहेबांच्या वारसदारांना संधी मिळाली पण..; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला
- ” असंतुष्ट आत्मांच्या छाताडावर बसून महापालिका जिंकणार”; संजय राऊतांची भीष्मप्रतिज्ञा
- राज ठाकरेंना हाफचड्डीपासून ओळखतो, हा त्यांचा सिझनेबल कार्यक्रम