पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अलिकडेच भेट घेतली. त्याआधी त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांच्या जाहीर भाषणात सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादी काॅंग्रेस ते उद्धव ठाकरे यांच्यावर चौफेर फटकेबाजी करत हिंदुत्तवाच्या मुद्दयावर जोरदार भाषण केलं. त्याचबरोबर त्यांनी मशिदीवरील भोंगे नाही तर त्याच्यापेक्षा दुप्पट हनुमान चालिसा ऐकवण्यास येईल असा इशारा देखील दिला. त्यामुळे त्यांच्यावर आता सगळीकडून टीका केली जात आहे. अशातच आता भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी याबाबत महत्वपूर्ण भाष्य़ केलं आहे.
” असंतुष्ट आत्मांच्या छाताडावर बसून महापालिका जिंकणार”; संजय राऊतांची भीष्मप्रतिज्ञा
रावसाहेब दानवे म्हणाले की, राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणाचा अंदाज घेतला आहे. त्यानुसार आम्हाला वाटत होतं की शिवसेनेनं हिंदूत्व सोडलं. परंतु आता त्यांच्या घरातूनचा आवाज उठायला लागला आहे. राज ठाकरे हिंदूत्वाच्या दिशेने चालले आहेत. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, माझी आणि राज ठाकरे यांची भेट होणार आहे. परंतु वेगळ्या विषयावर भेट होणार आहे. ही भेट राजकीय असणार नाही. अंसही ते म्हणालेत.
राज ठाकरेंना हाफचड्डीपासून ओळखतो, हा त्यांचा सिझनेबल कार्यक्रम
राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत. तो पर्यंत युती शक्य नाही, असंही ते म्हणालेत. त्याचबरोबर मुंबई महापालिकेवर भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिकेत राजकीय पक्षांची चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे.
मनसे भाजपची ‘सी’ टीम झाल्याचा आम्हाला आनंद; आदित्य ठाकरेंची मनसेवर खोचक टीका
दरम्यान, राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क याठिकाणी झालेल्या भाषणांत त्यांनी राजकीय नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना या दोन्हीं पक्षांवर चौफेर टीका केली. त्यामुळे त्यांच्या या भाषणांची चर्चा सध्या सर्वदुर सुरू झाली आहे. तसेच त्यांच्यावर टीका देखील करण्यात येत आहे.
Read also:
- भोंगा उतरवा म्हणणारे पहिले आपल्या बापाचे बाप होते; गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंना टोला
- पोलिसांनी दरेकरांविरोधात कारवाईचा फास आवळला; ‘बोगस मजूर’ प्रकरण भोवणार
- धनंजय तू बीडमध्ये मेळावा लाव मी येतो; मुलांच्या हातात कोयत्याऐवजी वही-पुस्तक देऊ; मुख्यमंत्री
- ऊसतोड कामगाराचा मुलगा सामाजिक न्यायमंत्री झालाय हे भाग्य; अजित पवार
- साहेबांच्या वारसदारांना संधी मिळाली पण..; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला