कोल्हापूर : कोल्हापुरात उत्तरेत विधानसभेची आता शेवटच्या महत्वपूर्ण टप्प्यात असून यानिमित्त एकमेकांवर टीका-टिप्पण्या वाढलेल्या दिसत आहेत. महाविकास आघाडी सरकारची युवा नेत्यांची, युवा मंत्र्यांची फौज कोल्हापुरात आता उतरली असून राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. मंत्री धीरज देशमुख, प्रणिती शिंदे, रोहित पवार, ऋतुराज पाटील, वरुण सरदेसाई हे सर्व नेते कोल्हापूर उत्तरेत राजकीय रणांगणात उतरले आहेत.
देशाला राहुल गांधींची गरज; ७८ वर्षीय महिलेने केली राहुल गांधींच्या नावे संपत्ती
यावेळी महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांनी भाजपवर सडकून टीका करत, भाजपची अक्षरशः लक्तरे काढली आहेत. काल रात्री कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडीकडून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात अनेकदा पोटनिवडणुका झाल्या. एखाद्याच्या घरात जर दुःखद घटना घडली असेल तिथं उमेदवार देत नाही अशी महाराष्ट्राची संस्कृती असताना, भाजप या संस्कृतीला छेद देत असल्याचा आरोप धीरज देशमुख यांनी केला आहे.
वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही अन्..; सभेत दगड फेकणाऱ्यांना चित्रा वाघ यांनी सुनावलं
कोल्हापुरात इलेकट्रीक गाड्यांच्या बाबतीतील निर्णय असो, विद्यार्थ्यांचे कौश्यल्य वाढविण्यासाठी घेतले जाणारे उपक्रम असो, क्रीडा संदर्भात घेतलेले निर्णय आमदार ऋतुराज पाटील यांनी भर सभेत सांगितले. भाजपकडे ना विकासाचा चेहरा आहे, ना ते विकास करू शकतात. त्यामुळे बेछूट आरोप करत ते सुटले आहेत असा टोला ऋतुराज पाटील यांनी हाणला आहे.
काॅंग्रेसने कधीही जातीचं राजकारण केलं नाही; पाटलांच्या वक्तव्यांनी अनेकांच्या भुुवया उंचावल्या
महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये मी कामानिमित्त फिरलो, लोकांना भेटलो तेव्हा महाविकास आघाडीबद्दल बोलताना लोकांनी सांगितले की जर महाविकास आघाडी अशीच टिकून राहिली तर महाराष्ट्रात भाजपचा सुपडा साफ होऊन जाईल. आमचा घात फक्त आणि फक्त भाजपने केला अशी टीकाही वरुण सरदेसाई यांनी केली आहे.
Read also:
- “ते अज्ञान लोक पंपावर पळून गेले की कदमवाडीला?”; सतेज पाटलांचा भाजपला खोचक सवाल
- राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यांवर मुस्लिम समाज नाराज! पुण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
- “जो हिन्दू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा”; भाजप नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
- “शेण खाणारी राष्ट्रवादीची औलाद आमची नाही”; मनसेची राष्ट्रवादी, शिवसेनेवर जहरी टीका
- “शिवसेना म्हणजे राष्ट्रवादीची ‘ढ’ टिम”; आदित्य ठाकरेंच्या टिकेला मनसेचं प्रत्युत्तर