मुंबई : गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा पाठिमागे लागला आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. त्यांची अलिबाग येथील मालमत्ता इडीने जप्त केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापण्याची शक्यता आहे. ईडीच्या कारवाईनंतर अशातच आता संजय राऊत यांनी मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, अशा कारवाईने मी किंवा शिवसेना खचणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचे 18 खासदारांपैकी 14 खासदार आमच्या संपर्कात; प्रसाद लाड यांचा दावा
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, इडीच्या अशा कारवायांना मी भीक घालत नाही. अशा कारवायांनी मी घाबरेन हा भाजपचा गैरसमज आहे. मी बाळासाहेबांचा निष्ठावंत सैनिक आहे. माझ्या अंगात शिवसेनेचं रक्त आहे. त्यामुळे मी घाबरणार नाही. सरकार पाडण्यासाठी आधी माझ्यावर दबाव होता. आता प्रत्यक्ष कारवाई केली आहे. माझ्या हत्येचा हिरेन पांड्या करण्याचा संबंधितांचा प्लॅन आहे, असा गंभीर आरोप देखील संजय राऊतांनी केला आहे.
कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही; रिपाइंची राज ठाकरेंविरोधात कारवाई करण्याची मागणी
राष्ट्रवादी काॅंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला. त्यानंतर या दोघांशीही माझं बोलणं झालं. त्यांच्याशी माझं माझ्यावर झालेल्या कारवाईसंबंधी बोलणं झालं आहे. माझ्या पक्षातील अनेक सहकाऱ्यांचे मला फोन आलेत. मी त्यांना इतकचं सांगितलं की मी घाबरत नाहीत मौनात मी नाही आता भाजप जाईल अंसही त्यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंचा मशिदीवरील भोंग्यांना विरोध; पुण्यात वसंत मोरेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
दरम्यान, इडीने आज संजय राऊत यांच्यावर कारवाई केल्यानंतर अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, मी तुरुंगात जायला तयार आहे, हे त्यांचे विधान म्हणजे मानसिक तयारी होती तर, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. संजय राऊत यांची अलिबागजवळील किहीमधील 8 भुखंड जप्त करण्यात आलं आहे. तसेच ईडीने 1 हजार 48 कोटींच्या प्रविण राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे. संजय राऊतांचे स्नेही प्रविण राऊत यांनी घोटाळा केला आहे. यामध्ये संजय राऊत हे देखील सहभागी आहेत. त्यांच्या पत्नीच्या खात्यात देखील पैसा आलं आहे. असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
Read also:
- त्यांची मानसिक तयारी होती तर..; इडीने राऊतांवर केलेल्या कारवाईवर भाजप नेत्यांची प्रतिक्रिया
- इडीचा संजय राऊतांना मोठा दणका; अलिबागजवळील जमीन, दादरमधील फ्लॅट जप्त
- शिवसेनेचे खासदार राष्ट्रवादीवर नाराज; दिल्लीतील बैठकीत महाविकास आघाडीत ‘बिघाडी’
- राज ठाकरे साहेबांवर नाराज नाही, पण भूमिका काय घ्यावी, समजत नाही? वसंत मोरे
- “गुढीपाडव्याच्या सभेत फायरब्रॅंड नेत्याला काय झालं? रूपाली पाटलांची राज ठाकरेंच्या भाषणांवर प्रतिक्रिया