‘माझ्या नातवाच्या मताला मी कवडीचीही किंमत देत नाही,’ अशा शब्दात शरद पवारांनी पार्थ पवार यांना फटकारलं होतं. आजोबांचे हे शब्द पार्थ पवार यांच्या चांगलेच जिव्हारी लागले. शरद पवार यांच्या वक्तव्याने दुखावलेल्या पार्थ पवार यांच्याशी काल रात्री सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली होती. मात्र अद्याप पार्थ पवारांची पुढील भूमिका ठरलेली नाही.
याबाबत पार्थ पवार कुटुंबातील इतर सदस्यांशीही चर्चा करणार आहेत. पार्थ पवार हे आपल्या सर्व काका आणि आत्यांशी चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती मिळाली आहे.
पार्थ पवार आता आपले काका जयंत पवार, श्रीनिवास पवार, अभिजित पवार यांच्याशी आणि त्यांच्या आत्यांशी चर्चा करणार असून पुढील निर्णय घेणार आहेत. आपले आजोबा शरद पवार यांच्या विधानामुळे दुखावले गेलेले पार्थ अद्यापही अस्वस्थ असल्याची माहिती मिळत आहे.