सांगली : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीत वादाची ठरलेल्या सांगलीच्या जागेवरून अजूनही वाद संपलेला नाहीय. यातच अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी श्रम परिहार म्हणून स्नेहभोजनाला हजेरी लावल्याने ठाकरे गटाने यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कॉंग्रेस गद्दार आहे. असा घणाघात आता ठाकरे गटाचे सांगली जिल्ह्याध्यक्ष संजय विभुते यांनी केलाय.
हेही वाचा…“शांत बसण्यासाठी पोलिसांना पैशाची पाकिटं गेलीत ?”रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणुक प्रचारासाठी राबलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी श्रम परिहार म्हणून स्नेहभोजन आयोजित केलं होतं. या स्नेहभोजनाला कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासह कॉंग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांना देखील निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. त्यावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
हेही वाचा..“तेव्हा तुमचा सागर बंगल्यावरचा बॉस झोपला होता का ?” शरद पवार गटाचा फडणवीसांना खोचक सवाल
विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वावर आम्ही काम करत आहोत. तर विशाल पाटील हे प्रदेश कॉंग्रेसचे अजूनही उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना निमंत्रीत करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा कॉंग्रेसला मिळाली नाही. त्यामुळे कार्यकर्ते नाराज होते. आगामी काळातील विधानसभा निवडणुकांमध्येही झपाट्याने कार्यकर्त्यांनी काम करावे या उद्देशाने हे स्नेहभोजन आयोजित करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पृथ्वीराज पाटील यांनी दिले आहे.
दरम्यान काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांची हकालपट्टी करावी, काँग्रेसने विशाल पाटील यांची हकालपट्टी केली नाही म्हणजेच गल्लीपासून दिल्लीपर्यंतची काँग्रेस ही विशाल पाटील यांच्या पाठीशी होती. सांगलीमध्ये महाविकास आघाडी टिकवायची असेल तर विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांची तातडीने काँग्रेसने हकालपट्टी करावी, अन्यथा सांगलीत महाविकास आघाडी राहणार नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना विधानसभेचे तोंड बघू देणार नाही, अशी शपथ शिवसेनेने घेतली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भांडण संपलं पाहिजे. परंतु ते शेवटपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम काँग्रेसने केलं. काँग्रेसने आता सांगलीत शिवसेनेकडून मदतीची अपेक्षा ठेवू नये. आमची लायकी निवडून येणारी नसली तरी तुम्हाला पाडण्याची लायकी नक्कीच आहे. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा..“पोलिस आयुक्तांची तातडीने बदली करा,” धंगेकरांनी काही बाबी समोर आणत केली मोठी मागणी
हेही वाचा..“नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्कमध्येच आहे का ?”, वसंत मोरेंचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा..“ठाकरेंचा शिलेदार शिंदेंच्या नेत्यासाठी भाजपसोबत भिडला”, पहा नेमकं घडलं काय ?
हेही वाचा..“सरकारी कामात अडथळा आणल्याने टिंगरेंवर गुन्हा दाखल करा”, वंचित बहुजन आघाडीची मोठी मागणी
हेही वाचा…” निवडणुकी आधी बंडखोरी, नंतर स्नेहभोजन,” सांगलीत विशाल पाटलांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक