मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर जिंकले काय आणि हरले काय, यात माझा काय दोष ? मतदार जे ठरवतात, ते होईल. पण अमोल जिंकला तर मला नक्कीच आनंद होईल, असे विधान गजानन किर्तीकर यांनी केले आहे. गजानन किर्तीकर यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण होत असून, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी करणारे पत्र शिंदे सेनेचे नेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. तर गजानन किर्तीकर यांनी कट रचला होता असा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. त्यावर आता ठाकरेंच्या शिलेदारांना शिंदे गटातील गजानन किर्तीकर यांची बाजू घेत भाजपवर जोरदार टिका केलीय.
हेही वाचा…बाथरूममध्ये पाय घसरून कॉंग्रेस आमदाराचा मृत्यू, कोल्हापुरात एकच खळबळ
गजानन किर्तीकर यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यातच गजानन किर्तीकर यांना शिवसेनेकडून खासदारकीची उमेदवारी घ्यायची होती. त्यानंतर ऐनवेळी ती उमेदवारी मागे घेऊन अमोल किर्तीकर यांना बिनविरोध खासदार करावा असा कट गजानन किर्तीकर रचत होते. असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलाय. त्यावर मी पक्षाचा राजधर्म पाळाला असून अमोल किर्तीकर यांच्या विरोधात प्रचार केल्याचे स्पष्टीकरण गजानन किर्तीकर यांनी दिलाय. तर किर्तीकर यांच्या पाठीशी ठाकरे गटातील नेते अंबादास दानवे धावून आले आहेत.
हेही वाचा…‘नाईट लाईफ संस्कृतीच्या अशा प्रकाराला आळा घाला”, लहू बालवडकर यांची मोठी मागणी
गजाभाऊ जुने शिवसैनिक राहिलेले आहेत. त्यांना लोकसभा निवडणुक लढवायची राहिली असती तर त्यांनी ती लढवली देखील असती. परंतु भाजपने जे आरोप केलेत ते बिलकुल खरे नाहीत. ते आमच्या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले. आमच्याशी गद्दारी केली हे खरं असलं तरी ते एक ज्येष्ठ नेते राहिले आहेत. त्यांनी असं कधी केलं असेल असं मला वाटत नाही. अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिलीय.
दरम्यान, भाजपने देखील सुरूवातीला असचं केलं आहे. ते सुद्धा आतून कोण कोणाला काय काय मदत करतात. याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. वरवर ते बडबड करतात. परंतु स्वत: च्या दंडावर बेडुक फुगवून दाखवण्याचं काम ते करतात. असा टोला देखील त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा..“सरकारी कामात अडथळा आणल्याने टिंगरेंवर गुन्हा दाखल करा”, वंचित बहुजन आघाडीची मोठी मागणी
हेही वाचा…” निवडणुकी आधी बंडखोरी, नंतर स्नेहभोजन,” सांगलीत विशाल पाटलांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
हेही वाचा…“शांत बसण्यासाठी पोलिसांना पैशाची पाकिटं गेलीत ?”रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
हेही वाचा..“तेव्हा तुमचा सागर बंगल्यावरचा बॉस झोपला होता का ?” शरद पवार गटाचा फडणवीसांना खोचक सवाल
हेही वाचा…वायकर जिंकले काय अन् हरले काय ? माझा काय दोष ? गजानन किर्तीकरांच्या विधानाने खळबळ