पुणे : कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघातात ससून रूग्णालयातील दोन डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे. यामधील डॉ. अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हळनोर यांचा समावेश आहे. या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकारने रवीवारी रात्री उशीरा अटक केली आहे. यातच पोलिसांनी तावरे अन् श्रीहरी यांची कसून चौकशी सुरू केली आहे. यातच सगळ्यांची नावं उघड करणार असा इशारा तावरे यांनी दिला आहे.
हेही वाचा..शरद पवारांचे दोन शिलेदार अजित पवार गटात दाखल, लवकरच धमाका नं. २ होणार
आरोपीच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याप्रकरणी तावरे आणि श्रीहरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक झाल्यानंतर त्यांची आता गुन्हे शाखेकडून कसून चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीत अजय तावरे यांनी मी गप्प बसणार नाही. सगळ्यांची नावं उघड करेन, असा गर्भीत इशारा दिला आहे. त्यामुळे तावरे यांनी नेमका कुणाला इशारा दिला आहे. त्याचं गुढ अद्यापही तसचं आहे.
हेही वाचा..भुजबळ म्हणताहेत, विधानसभेला आम्हाला ८० ते ९० जागा, मग भाजप अन् शिंदेंच्या वाट्याला किती ?
त्याआधी वडगावशेरी मतदारसंघातील आमदार सुनील टिंगरे यांचं नाव समोर आलं आहे. डॉ. अजय तावरे यांच्या ससून रूग्णालयात नियुक्तीसाठी टिंगरे यांनी वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे शिफारस केल्याचे उघड झाले आहेत. त्याआधी अपघात झाल्यानंतर सुनील टिंगरे आरोपीला ज्या पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं होतं. त्याठिकाणी टिंगरे गेल्याची माहितीही आहे. त्यामुळे आता टिंगरे यांना चौकशीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा..पुणे कार अपघात प्रकरणात अजित पवार गटाच्या आमदाराचं नाव समोर, आव्हाडांचं ‘ते’ ट्विट चर्चेत
हेही वाचा…“निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये, अन् पराभावाने खचूनही जाऊ नका”
हेही वाचा…“मी दोषी असेन तर मलाही शिक्षा द्या,” पुणे अपघात प्रकरणी अजित पवार असं का म्हणाले ?
हेही वाचा..शरद पवारांचे दोन शिलेदार अजित पवार गटात दाखल, लवकरच धमाका नं. २ होणार