पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबईतील साकीनामा पोलिसांनी तब्बल १५दिवसानंतर चेन्नई मधून अटक केली आहे. ललित पाटीलला अंधेरी कोर्टात घेऊन जात असतांना त्यांनी मोठं विधान केलं आहे. ससूनमधून मी पळून गेलो नाही तर पळवलं गेलं, याप्रकरणात कोणाचा हात आहे. सर्व सांगणार. असा गौप्यस्फोट ललित पाटील यांनी केला आहे. याप्रकरणात आघाडीतील नेत्यांनी मंत्री दादा भूसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यातच आता या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही संबंध असल्याचं शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…काकांचा सल्ला ऐकला…! ४० वर्षांपासूनचा राष्ट्रवादीचा निष्ठावंत माजी आमदार परतला
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात दादा भूसे यांच्यावर सुषमा अंधारे यांनी आरोप केले होते. यातच ललित पाटीलला अटक केल्यानंतर त्यांनी या प्रकरणात राजकीय नेत्याचा हात असल्याचं सांगितले आहे. तसेच पळून नाही तर पळवून लावलं असल्याचं धक्कादायक विधान त्याने केलंय. यावरून ललित पाटीलला अटक करण्याचं श्रेय घेत असाल तर फरार कण्याचंही श्रेय फडणवीसांनी घ्यावं, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलंय.
हेही वाचा…ड्रग्ज माफिया ‘ललित पाटला’च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, महायुती सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचा होता आशीर्वाद?
ललित पाटील फरार झाल्यानंतर तो इकडे तिकडे फिरत होता. परंतु त्याला अटक केल्यानंतर तो जळगाव, चाळीसगाव आणि धुळ्यालाही येऊन गेला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मध्ये तो तीन दिवस राहिला होता. याची एक बातमी आली आहे. जळगाव, धुळ्याला तो कशासाठी आला होता ? नाशिकमध्ये पालकमंत्री असताना त्याचे काही लोकांशी संबंध आलेत. असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
हेही वाचा…काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर, 500 रुपयांना गॅस सिलिंडर देणार
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसापासून ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणाशी निगडीत अनेक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर अनेक ठिकाणी धाडी टाकत करोडो किमंतींचा ड्रग्जसाठा पोलिसांनी जप्त केलाय. त्यामुळे या प्रकरणात एकट्या ललित पाटील याचा हात नसून यात मोठ्या राजकीय नेत्याचा हात असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यातच आता ललित पाटील याची चौकशी केल्यानंतर सर्व काही समोर येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची आता संपूर्ण राज्यात चर्चा सुरूय.
READ ALSO :
हेही वाचा…“ललित पाटीलला भरचौकात फाशी द्या,” कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकरांनी केली मागणी
हेही वाचा…जरांगेंच्या अल्टिमेटला सहा दिवस बाकी, उपसमितीच्या बैठकीत मराठा समाजासाठी घोषणांची बरसात
हेही वाचा…“ससून मधून पळून गेलो नाही, मला पळवलं गेलं, सर्व सांगणार,” अटक केल्यानंतर ललित पाटलाचा व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…लोकसभेच्या ४८ पैकी २२ जागांवर शिंदे गटाचा दावा, मग अजित पवार गटाला किती जागा मिळणार ?
हेही वाचा…“ललित पाटीलचा जयसिंघानी होऊ नये, ‘या’ मोठ्या नेत्यांनी व्यक्त केली भिती”, प्रकरणात मोठ्या मंत्र्यांचा संबंध?