मुंबई : देशभरात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातदेखील अशीच परिस्थिती असून, याचा मोठ्या फटका आरोग्य यंत्रणेला बसत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर, बेड्स, लस यांची राज्यात कमतरता जाणवत आहे, मात्र यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना, पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये प्रत्येक पात्र नागरिकाला केंद्र सरकार मोफत लसीकरण उपलब्ध करुन देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही. मात्र एखाद्या राज्याला वेगाने लसीकरण करायचं असल्यास, बाजारात लस उपलब्ध आहेत,’ असं वक्तव्य केलं होतं.
त्यांच्या या वक्तव्याचा दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवारांनी त्यांच्यावर ट्विट करून टीका केली आहे. ‘सन्माननीय विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी ‘केंद्र सरकार मोफत लसीकरण करत असून राज्यांवर लसीकरणाचा भार येणार नाही’, असं माध्यमांशी बोलताना आपलं वक्तव्य ऐकलं. कदाचित आपल्याकडून घाईत हे चुकीचं वक्तव्य झालं असावं. पण यामुळं जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.”, असे ट्विट रोहित पवार यांनी केलंय.
सन्माननीय विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी 'केंद्र सरकार मोफत लसीकरण करत असून राज्यांवर लसीकरणाचा भार येणार नाही', असं माध्यमांशी बोलताना आपलं वक्तव्य ऐकलं. कदाचित आपल्याकडून घाईत हे चुकीचं वक्तव्य झालं असावं. पण यामुळं जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. pic.twitter.com/wzznx8doFv
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 26, 2021
दुसरीकडे देशात १ मेपासून लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत १८ वर्षांच्या पुढील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. तसेच, अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली असून, राज्यात मात्र ठाकरे सरकारकडून अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांकडून, संभाव्या मोफत लसीकरणाच्या श्रेयासाठी अनेक उलट सुलट विधानं केली जात असल्यामुळे, मोफत लसीकरणाला घेऊन एकूणच गोंधळ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.