पुणे : दक्षिण नगरमधील नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी पुण्यातील प्रसिद्ध गुंड गजा मारणे यांची भेट घेतली आहे. यापुर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी अजित पवारांनी पार्थ पवारांना चांगलेच फटकारले होते. यातच आता निलेश लंके यांनी भेट घेतल्यानंतर त्यांच्यावर सध्या टिकेची झोड उठवली जात आहे. त्यावरून शरद पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी निलेश लंके यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय.
हेही वाचा..“RSSअन् भाजपकडून एवढे हाडतुड केले तरी मित्र मंडळ तिथचं”, शरद पवार गटाने डिवचलं
अमोल मिटकरी म्हणाले की, निलेश लंके साहेब आपण गजा मारणेकडे भेट द्यायला गेला होतात. मात्र नंतर आपण बोलतात की त्याबद्दल तुम्हाला माहिती नव्हतं. मित्र म्हणून माझी विनंती आहे की, पुण्यातील गुन्हेगारीवर वेळोवेळी बोलणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे व बालमित्रमंडळाच्या अध्यक्षाला विचारून पुढे पुण्यात जात जावा.
हेही वाचा…“मुख्यमंत्री पदासाठी आमच्या पक्षात ‘जयंत पाटील’ सक्षम नेतृत्व”, रोहित पवारांचा मोठं विधान
तसेच ताईंना व बालिशला बारामती लोकसभा व पुणे जिल्ह्यातील प्रवृत्तीबद्दल इंचा इंचाची माहितीय. म्हणूनच गतवेळी त्यांनी बारामतीत गुंडांचा वापर झाला. अशी विधाने केली होती. तुम्ही साधे व नवीन आहात. त्यामुळे येथून अभ्यासू लोकांना विचारून पुण्यात जात चला. असाही टोला त्यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा..एनडीए आघाडीमध्ये लवकरच भूकंप होणार ? काही खासदार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत
हेही वाचा..“बारामतीत झालेल्या पराभावासाठी मला चिंतन करण्याची काहीही गरज नाही”
हेही वाचा…अजित पवारांच्या अडचणी वाढल्या? अण्णा हजारे देणार क्लोजर रिपोर्टला कोर्टात आव्हान
हेही वाचा…“आता विधानसभेत विजय मिळाल्यानंतरच गळ्यात हार घालणार”, फडणवीसांनी विजयाचं घेतलं प्रण
हेही वाचा..“अपमान झाल्यानं नाशिक लोकसभेच्या निवडणूकीतून माघार घेतली”, भुजबळांचं मोठं विधान