IMPIMP

गँगस्टर विकास दुबे पोलीस चकमकीत ठार

उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे 8 पोलिसांची हत्या करणाऱ्या गँगस्टर विकास दुबेला काल पोलिसांनी उज्जैन येथून अटक केले होते. मात्र आता विकास दुबे पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. उज्जैनवरून विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चाललं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी झालेल्या चकमकीत विकास दुबे ठार झाला.

पोलिसांनुसार, विकास दुबेला आणताना एसटीएफच्या गाड्यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. अपघातानंतर विकास दुबेनं एसटीएफच्या एका अधिकाऱ्याच्या हातातला पिस्तुल हिसकावून घेतला आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला सरेंडर करण्यास सांगितलं. मात्र विकासने पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. यानंतर विकास दुबे आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू झाली. त्यात विकास दुबे मारला गेला.

दरम्यान, 8 पोलिसांची हत्या करणारा विकास दुबे अनेक दिवसांपासून फरार होता. त्याच्यावर 5 लाखांचे बक्षीस देखील होते. त्याला काल मध्य प्रदेशातील उज्जैन येथील एका मंदिरातून अटक करण्यात आले होते.