इंदापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सध्याच्या पक्षाला सोडचिट्ठी देऊन नवीन पक्षात प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची संख्या देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, युवा नेते संग्रामसिंह पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
…अशाप्रकारे फडणवीसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले, भाजप हा ओबीसींचाच पक्ष आहे
प्रशांत पाटील हे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू असून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पक्षाचे राजकीय बळ वाढले आहे. यावेळी, त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, “इंदापूर तालुक्याची जडण-घडण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारातून झाली असल्याने, माझी भाजपत घुसमट होत होती. मात्र, आता मी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून तालुक्याचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे सांगितले.
दरम्यान, त्यांच्या या राष्ट्रवादी प्रवेशामुळे बावडा गाव, बावडा-लाखेवाडी जिल्हापरिषद मतदार संघ, तसेच तालुक्याच्या राजकीय वर्तुळात जबरदस्त उलथापालथ होण्याची शक्यता आहे. यातच, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी काम पहिले आहे आणि ते अभ्यासू वक्ते म्हणून परिचित आहेत. त्यांच्या या प्रवेशावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, तालुका उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीराव इजगुडे, सचिन सपकळ, रणजित घोगरे उपस्थित होते.
पुण्यातल्या आढावा बैठकीत अजित पवारांनी केले, राज्याच्या महामारी परिस्थितीबद्दल भाष्य
काँग्रेसमध्ये असलेल्या पाटलांनी भाजपत प्रवेश केल्यावर, त्यांचे राजकीय बळ वाढेल असे अजूनही त्यांच्याकडून काही घडलेले नाही. आता त्यांच्या भावाने पक्षबदल केल्याने, घरातूनच त्यांना तगडे आव्हान मिळण्याची शक्यता बळावली आहे. तसेच, यामुळे इंदापूरमध्ये असलेल्या त्यांच्या वर्चस्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरु असल्याचे दिसते आहे. मात्र, प्रशांत पाटलांच्या प्रवेशाने दत्तात्रय भरणेंचे आणि राष्ट्रवादीचे इंदापूरात राजकीय बळ वाढले आहे, हे नक्की!
Read Also :
- लोकसंख्या पाहता पुणे शहरात दोन महानगरपालिका अस्तित्वात आणणे गरजेचे – रामदार आठवले
- मोठी बातमी! ईडीकडून अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त
- पुणे महापालिकेच्या २३ गावांचा विकास आराघडा तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारला – अजित पवार
- तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास महाराष्ट्र सज्ज, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांवर एकच धोरण ठरवा – मुख्यमंत्री
- पुन्हा एक झटका : अजित पवारांसह अनिल परबांची CBI चौकशी होणार, उच्च न्यायालयात याचिका दाखल