मुंबई : १०० कोटी वसुली प्रकरणात आरोप असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली असून, त्यांची तब्ब्ल ४ कोटी २० लाखांची मालमत्ता ईडीने तातडीनें जप्त केली आहे. त्यामुळे आता अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
पुजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांना क्लिन चीट; राठोड यांचं होणार पुनर्वसन?
ईडीने देशमुखांना याआधी ३ वेळा चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण प्रकृतीचं कारण देऊन त्यांनी चौकशीला येण्याचे टाळले, अशी चर्चा होती. तसेच, ईडीने या प्रकरणात देशमुखांच्या दोन सचिवांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून बाहेर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने ही कारवाई केली असून, ईडीने देशमुखांच्या नागपुरातील, वरळीतील आणि पनवेलमधील संपत्तीवर जप्तीची कारवाई केली आहे.
लोक जेव्हा मला शिव्या देत होते, त्या काळात शरद पवारांनी विरोधीपक्ष नेता केले
दरम्यान, या कारवाईत नेमकं काय-काय जप्त केलं गेलं आहे, याचा खुलासा अजून ईडीकडून करण्यात आलेला नसून, येत्या काळात ईडीकडून अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांची, तसेच त्यांच्या पत्नीची चौकशी केली जाऊ शकते. ईडीने देशमुख यांच्या एका मुलाला आणि त्यांच्या पत्नीलादेखील या प्रकरणी समन्स बजावले होते. पण सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याने त्यांची अजून चौकशी करण्यात आलेली नाही.
काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान, ‘ठाकरे सरकारच रिमोट कंट्रोल शरद पवारांच्या हातात’
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी, देशमुखांवर कथित १०० कोटी वसुलीचे आरोप केले आहेत. सध्या या आरोपांचा तपास ईडीकडून सुरु असून, यात ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर, तसेच काही कार्यालये आणि कंपन्यांवर छापे टाकले होते. तसेच, या प्रकरणातील आणखीन एक मुख्य आरोपी असलेले सचिन वाझे यांची देखील ईडीकडून चौकशी सुरु असून, त्यांनी ईडीकडे मोठे खुलासे केल्याचं सांगण्यात येत आहे.
Read Also :
- पुणे महापालिकेच्या २३ गावांचा विकास आराघडा तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारला – अजित पवार
- तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास महाराष्ट्र सज्ज, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांवर एकच धोरण ठरवा – मुख्यमंत्री
- आत्तापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड ब्रेक; दहावीच्या निकालात ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के मार्क
- पुण्यातील सत्ताधारी भाजपला अतिअहंकार भोवणार? विरोधकांनी महापालिका प्रशासनाला धरले धारेवर
- पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर थकीत पैशांप्रकरणी वसुलीची कारवाई