सिंधुदुर्ग : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एका एसटी कर्मचाऱ्याने एसटीच्या शिडीला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात असून, कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येस सरकारच जबाबदार असल्याचा घणाघात केला जात आहे. आता यावरून केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी देखील सरकारवर तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
मुलींमुळे मुलं बेरोजगार होतील; राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचे खळबळजन वक्तव्य
सिंधुदुर्गात नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. पगार किती आहेत हे माहिती नाही, ही अवस्था एसटीची आहे. एसटी बसेसची अवस्था तर अशी झाली आहे की खरंतर त्यांना रस्त्यावर आणण्याची परवानगी नसली पाहिजे. खरंतर त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढं त्याने कमवलं आहे. सगळ्यांचे पैसे तो गोळा करतो, तो शिवसेनेचा कलेक्टर आहे, ही उद्याची हेडलाईन आहे, असं म्हणत नारायण राणेंनी नाव न घेता अनिल परबांवर घणाघाती टीका केली.
एसटी चालकाची आत्महत्या; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी सरकारला दिला ‘हा’ इशारा
सी वर्ल्ड आहे त्याच जागेवर उभारण्यात येणार आहे. कोणी काहीही न करता जागा बदलणार म्हणत असेल तर त्याला काय अर्थ आहे. सी वर्ल्ड पण त्याच जागेवर होणार आहे. नाणार प्रकल्प पण त्याच ठिकाणी होणार आहे. हे दोन्ही प्रकल्प त्याच जागी होणार असल्याची घोषणा नारायण राणेंनी केली. शुक्रवारी अहमदनगर येथे एका एसटी कर्मचाऱ्याने चक्क एसटी बसच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी शिडीला गळफास लावून आत्महत्या केली. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील दिलीप काकडे असे या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.
Read Also :
- छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे नाशिकमध्ये एकाच मंचावर येणार; काय आहे नेमकं कारण…वाचा…
- अखेर आर्यन खान 27 दिवसानंतर तुरुंगाबाहेर, मन्नतवर दिवाळी; राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी थंडावणार?
- पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणवीसांचा पोपट चिट्ठ्या काढतो; नवाब मलिकांचा पटलवार
- अकोल्यात वंचितच्या सत्तेला धक्का; दोन्ही सभापतीपदांवर महाविकास आघाडीचा विजय; भाजपचीही साथ
- गुन्हेगारीवरून भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय चिखलफेक; गुंडगिरीत सहभागाचा महापौरांचा आरोप