“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी बसून खूप काळजीपूर्वक काम करत आहेत. त्याचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत. ते आम्हाला वरुन सूचना देतात,” असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
“राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, एक मातोश्रीमध्ये, तर दुसरे राज्यभर फिरत आहेत,” अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांवर निशाणा साधला होता.
तर आज ‘शिवसंग्राम’चे अध्यक्ष विनायक मेटे यांनी “राज्यात तीन मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे नावाला मुख्यमंत्री, मंत्रालयातून काम करणारे अजित पवार हे दुसरे मुख्यमंत्री, तर शरद पवार हे सुप्रीम मुख्यमंत्री आहेत” अशी टीका केली होती. या टीकेला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्युत्तर दिलं.