मुंबई : जगभरात आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस साजरा केला जात आहे. पुरूष दिवसाचं निमित्त साधत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “नॉटी पुरूषांच्या आचार विचाराची घाण घालवून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करा,” असं आव्हान करत अमृता यांनी राऊत यांना नामोल्लेख टाळत टोला लगावला आहे.
अमृता फडणवीस राजकारणापासून अलिप्त असल्या तरी राज्यातील आणि देशातील वेगवेगळ्या मुद्यांवर त्या भूमिका मांडतात. अनेक वेळा त्या चर्चेतही आल्या. आंतरराष्ट्रीय पुरूष दिनाचं निमित्त साधत अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.
आज #InternationalMensDay2020 और #WorldToiletDay2020 पर सभी देशभक्त पुरुषों को, एक आम औरत की ओर से निवेदन करती हूँ की आप सब एक होकर, बुरी सोच वाले कुछ नाममात्र ‘naughty’ मर्दो के आचार-विचार की गंदगी फ्लश करके महाराष्ट्र को स्वच्छ रखने में मदत करे! #toiletday #InternationalMensDay
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 19, 2020
आज आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस आहे आणि जागतिक शौचालय दिनही आहे. यानिमित्ताने मी देशातील सर्व पुरुषांना एक सर्वसामान्य स्त्री म्हणून आवाहन करते की, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही मोजक्या नॉटी पुरूषांच्या आचार विचारांची घाण फ्लश करून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करावी,” असं म्हणत अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.
Read Also ;
फडणवीसांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही: जयंत पाटील
भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
शिवसेनेच्या वचननाम्यातील ३० टक्के विज दर कपातीचे आश्वासन कागदावरच
“खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केले “
‘लातों के भूत बातों से नहीं मानते” म्हणत मनसेचा आंदोलनाचा इशारा