दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. अमित शाह यांनी बोलावलेल्या या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीत अद्यापही करोना स्थिती नियंत्रणात आलेली नाही. यामुळे दिल्लीकरांची चिंता वाढली आहे. राजधानी दिल्लीमधील करोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी अमित शाह आणि अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक बैठका घेतल्या आहेत.
Union Home Minister Amit Shah has called a meeting later today at North Block to take stock of the COVID-19 situation in Delhi; Union Health Minister Dr Harsh Vardhan, Delhi Lieutenant Governor Anil Baijal, and CM Arvind Kejriwal to be present.
(file pic) pic.twitter.com/qUQgn6bGf2
— ANI (@ANI) November 15, 2020
बैठकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजलदेखील उपस्थित राहणार आहेत. दिल्लीमधील करोनाबाधित रुग्णसंख्या १२ दिवसांपासून वाढत चालल्याचं दिसत आहे. रुग्णसंख्या कमी होत असतानाच ३ नोव्हेंबरला दिल्लीत एका दिवसात सर्वाधित ६७३५ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.
Read Also :
असदुद्दीन ओवेसी म्हणजे दुसरे जिना, शायर मुनव्वर राणांची बोचरी टीका
मेधा कुलकर्णी भाजप सोडणार का? म्हणाल्या….
….तर राज्यात अक्षता पडायच्या आधीच नवरी पळाली, मंत्री वडेट्टीवारांचा दानवेंना टोला
नितीश कुमार यांना मिळणार मुख्यमंत्रीपद पण एनडीएच्या ‘या’ अटी आणि ही ‘नियम’ पाळावी लागणार