पुणे : पवार कुटुंबियांच्या ५७ कंपन्यापर्यंत आमची टीम पोहोचली आहे. या कंपन्यात पवार कुटुंबियांची नामी बेनामी मालमत्ता आहेत. अजित पवार आणि कुटुंबियांवर आयकर विभागाची सुरू असलेली कारवाई हिंदुस्थानातील सर्वात मोठी कारवाई आहे. भिंतीत, बेसमेंट आणि मोकळ्या जागेत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय काय सापडले आहे ते लवकर कळेल. अजित पवार यांच्यावर वेबसिरीज काढायची असेल तर त्यांना २०० ते ३०० कोटींची मिळेल. पुण्यात पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या बोलत होते.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदमांना नो एन्ट्री; व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण भोवल?
”अजित पवार आणि पवार कुटुंबियांचा हिशोब मी आज मांडणार आहे. जरंडेश्वर आणि इतर कारखान्यात कोण कोण भागीदार आहे ते मी आज सांगणार आहे. जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी विक्रीत घोटाळा झाला आहे हे न्यायालयानेही सांगितले. या कारखान्यात अजित पवार सर्वेसर्वा होते. अजित पवार यांनी स्वतः त्या कारखान्याची विक्री केली आणि स्वतः तो इतर कंपनीच्या माध्यमातून विकत घेतला. हे सर्व करताना त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.”
अजित पवार अडचणीत येणार; ‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या दादांच्या सहीचा कागद दाखवणार
”अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी आयकर विभागाच्या धाडी सुरू आहेत. पहिल्या दिवशी त्यांनी भावूक स्टेटमेंट दिले. मी पवार कुटूंबीयांना विचारू इच्छितो की, मोहन पाटील, नीता पाटील आणि विजया पाटील हे कोण आहेत हे त्यांनी सांगावे. हे तिघेही अजित पवारांच्या वेगवेगळ्या कंपन्यात पार्टनर आहेत. आणि अजित पवार सांगतात माझ्या बहिणीच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी का गेले. बहिणीच्या नावाने बेनामी मालमत्ता अजित पवारांनी उभ्या केल्या आहेत असंही ते म्हणाले आहेत.”
Read Also :
- २० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू, उदय सामंत यांची माहिती; वाचा नवी नियमावली
- मोठी बातमी: अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींच पॅकेज जाहीर; ठाकरे सरकारचा निर्णय
- …तर मावळात राष्ट्रवादीचा आमदार ९० हजार मतांनी कसा निवडून आला? पवारांचा फडणवीसांना प्रतिप्रश्न
- अनिल देशमुखांच्या घरावर पाचवेळा छापेमारी, आरोप करणारे मात्र आता कुठे दिसत नाहीत – शरद पवार
- फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा पाकिटमारी झाली तरी बातम्या चालायच्या – चंद्रकांत पाटील