मुंबई : आता अजित पवारांना कुणीच वाचवू शकत नाही, असा हल्लाबोल भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे. अजित पवारांनी सही केलेला कागद दाखवणार असा दावा सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे.
आजही मीच मुख्यमंत्री असल्यासारखं मला वाटतंय – देवेंद्र फडणवीस
किरीट सोमय्या म्हणाले, “अजित पवारांची एवढी समृद्धी आहे की किरीट सोमय्यांनी पाहायला यावं असे मेसेज फिरतात, तर त्यांच्या कारस्थानाचा एक नमुना आज मी जनतेसमोर आणणार आहे. ठाकरे, पवार यांनी दीड वर्षात अनेक घोटाळे केले, मंत्रालयासमोर बॅनर लावले, माझ्या कुटुंबियांवर आरोप केले, तर उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यात हिम्मत असेल तर माझे घोटाळे बाहेर काढा, चौकशी करा, शिक्षा करा. तुमचे दोन डझन नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले, सातव्या दिवशीही घोटाळे बाहेर निघत आहे”
शिवसेना खासदार भावना गवळींवर अटकेची टांगती तलवार; ईडीची ३ पथकं वाशिममध्ये दाखल
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांमध्ये हिम्मत असली पाहिजे. शरद पवारांच्या रिमोटव्दारे घोटाळे होत आहेत, त्याचं उत्तर द्यावं. त्यांच्या स्टेटमेंटची किंमत नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सेशन कोर्टापासून कुठल्याच कोर्टाने हात धरला नाही, त्यामुळे मान्य करा की तुम्ही घोटाळे करत आहात, असा हल्लाबोल सोमय्यांनी केला.
विमानतळाच्या उद्धाटनला शेजारी-शेजारी बसले; तरीही राणे-ठाकरेंनी एकमेकांकडे पाहिलं नाही
अनिल देशमुख, अनिल परब, प्रताप सरनाईकांसाठीही उद्धव ठाकरे कोर्टात गेले, काय झालं? भावना गवळींच्या ट्रस्टमध्ये 22 कोटींचा घोटाळा झाला आहे. ठाकरे साहेबांना दिसत नाही. नेते घोटाळा करतात शरद पवार, उद्धव ठाकरेंना दिसत नाही? भावना गवळींनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे. घरात 25 कोटी कॅश ठेवली, “अखेर तो मां का बुलाया आया हैं, आर्थर रोड जेल जानाही पडेगा..”, असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला. आमच्यासाठी जो घोटाळा करेल तो टार्गेटवर असेल, असा इशारा सोमय्यांनी दिला.
Read Also :
- देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तक्रार दाखल; साक्ष नोंदणी प्रक्रिया सुरू, वाचा काय नेमकं प्रकरण…
- एकनाथ खडसेंना तुर्त दिलासा, पण पत्नीला अटक होणार? न्यायालयाने अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला
- तुम्ही मुख्यमंत्री नाहीत हे मनातून काढून टाका; नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा
- महापालिकेत भाजपा-मनसेची युती पक्की? कोअर कमिटीच्या बैठकीआधीचं मनसेनेते फडणवीसांच्या भेटीला
- शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदमांना नो एन्ट्री; व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण भोवल?