मुंबई : कथित भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात पीएमएलए विशेष कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज फेटाळला आहे. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. त्याचवेळी एकनाथ खडसे यांना प्रकृतीच्या कारणास्तव तूर्तास दिलासा देऊन कोर्टाने पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.
पिंपरी चिंचवड शहराला फेसबुक आणि ट्विटरवर स्वतंत्र ओळख द्या – आमदार महेश लांडगे
एकनाथ खडसे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या ते मुंबई रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे ते आज सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. खडसे यांना अजून काही दिवस रुग्णालयात राहावे लागणार आहे, असे सांगत त्यांच्या वकिलांनी न्यायालयात हजर राहण्यासाठी आणखी वेळ मिळावा, अशी विनंती केली. त्यावर खडसे यांची ही विनंती न्यायालयाने मान्य केली आहे व या प्रकरणात पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.
विमानतळाच्या उद्धाटनला शेजारी-शेजारी बसले; तरीही राणे-ठाकरेंनी एकमेकांकडे पाहिलं नाही
पुणे येथील भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे. याच प्रकरणात एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसे यांच्यावरही ईडीकडून आरोप ठेवण्यात आलेले आहेत. या दोघांवरही अटकेची टांगती तलवार असतानाच आज पीएमएलए विशेष कोर्टात मंदाकिनी खडसे यांना मोठा धक्का बसला. मंदाकिनी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज पीएमएलए विशेष कोर्टाने फेटाळला आणि त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Read Also :
- तुम्ही मुख्यमंत्री नाहीत हे मनातून काढून टाका; नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा
- महापालिकेत भाजपा-मनसेची युती पक्की? कोअर कमिटीच्या बैठकीआधीचं मनसेनेते फडणवीसांच्या भेटीला
- शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदमांना नो एन्ट्री; व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण भोवल?
- मोठी बातमी: २ ते १८ वर्षांच्या मुलांना लसीकरणासाठी केंद्र सरकारची मंजूरी; कोणती लस मिळणार?
- ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढली, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं – पंकजा मुंडे