मुंबई : शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसांपुर्वी लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तूळात चर्चांना उधान आले आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करून भाजपसह माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर चांगलाच निशाना साधला होता. आता बावनकुळे यांनी मिटकरींच्या टीकेला उत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा ट्विट केले आहे. त्यामुळे मिटकरी आणि बावनकुळे यांच्यात वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.
मिटकरी यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, मी भाजपाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पक्षाने मला खूप काही दिले आहे. मी रेडिमेड आमदार नाही. मी कार्यकर्ता आहे.
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 22, 2021
अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “बावनकुळे यांनी प्रताप सरनाईक व महाविकास आघाडी सरकारच्या बाबत बोलण्यापेक्षा विधानसभेच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी तिकीट कापून वेशीवर का टांगलं याचं चिंतन करावं. प्रताप सरनाईक यांचं लेटर अनेक अंगानी भाजपलाच डिवचणारं असुन भाजपाच्या राजकीय दहशत वादाचं दर्शन घडवणारं आहे,” असे मिटकरी यांनी जोरदार टिका करत ट्विट केले होते.
बावनकुळे यांनी प्रताप सरनाईक व मविआ सरकारच्या बाबत बोलण्यापेक्षा विधानसभेच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी तिकीट कापून वेशीवर का टांगलं याचं चिंतन करावं . प्रताप सरनाईक यांचं लेटर अनेक अंगानी भाजपलाच डिवचणारं असुन भाजपाच्या राजकीय दहशत वादाचं दर्शन घडवणारं आहे.@TV9Marathi
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 22, 2021
मिटकरींच्या ट्विटला उत्तर देताना बावनकुळे यांनी म्हटले आहे की, “मिटकरी यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, मी भाजपाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पक्षाने मला खूप काही दिले आहे. मी रेडिमेड आमदार नाही. मी कार्यकर्ता आहे, अशा शब्दात बावनकुळे यांनी मिटकरींवर निशाना साधला आहे.
Read Also :
- विजय शिवतारे यांना ह्रदयविकाराचा झटका; भावांमुळे वडिलांची ही अवस्था झाल्याचा मुलीचा आरोप
- खासदार नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती
- हे जेनतेच्या हिताच सरकार आहे की तमाशा आहे? – देवेंद्र फडणवीस
- “राष्ट्रमंच’ हा केवळ बातमीत राहण्यापुरता केलेला केविलवाणा आणि नवा हास्यास्पद प्रयोग”
- महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे का? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…