मुंबई: आज मुंबईत एका कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंनी पक्षप्रवेश केला आहे.मी ४० वर्ष भाजपमध्ये काम केल आहे. मला अशी अपेक्षा नव्हती कि भाजप मला अशा पद्धतीने वागणूक देईल, पण आता मोकळा श्वास सोडलंय आत प्रवेश करताना मी कुठलीही अट किंवा आमिष घेऊन राष्ट्रवादीत आलेलो नाही, मी प्रामाणिकपने राष्ट्रवादीच काम करणार आहे, असं पक्षप्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. तसेच यांनी प्रवेश करतानाच्या भाषणात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
पक्षप्रवेश झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी सभागृहाला संबोधित करताना अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट करताना काही भावनिक वक्तव्यही केली आहेत. आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. चार वर्षानंतर आज मन हलकं झालं, डोक्यावरचं ओझं गेलं, पवार साहेब तुम्ही मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला हे बरं झालं, नाही तर मी गेलोच होतो. अशी भावनिक प्रतिक्रिया राज्याचे माजी महसूल मंत्री, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना खडसे भावूक झाले होते.
भाजपमध्ये माझ्यावर प्रचंड अन्याय होत असताना मी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ हि गोष्ट घातली तेव्हा भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं तुम्हाला पक्षात संधी नाही असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. आता मी मोकळा श्वास घेतलाय. मी भाजपत असताना माझ्यावर अनेक चौकश्या लावण्यात आल्या. माझी अगदी ईडी चौकशी करण्याचीही मागणी स्वपक्षीयांनी केली होती पण आता त्यांनी ईडी लावली तर मी त्यांच्यामागे सीडी लावेल लावेल असा इशारा एकनाथ खडसे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.
बाईला समोर ठेऊन मी राजकारण करत नाही, असा टोला भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना देवेंद्र फडणवीसांवे लगावला आहे. खडसे असताना सामाजिक कार्यकरत्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर मोठे गंभीर आरोप केले होते. आणि त्या आरोपांना फडणवीसांचे बळ आहे असा आरोप अनेकदा एकनाथ खडसेंनी केला होता.
सर्वांना प्रतीक्षा असताना आता भाजप नेते एकनाथ खडसे यांची अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपासून खडसे हे भाजप सोडणार याची मोठी चर्चा सुरु होती. पण आता ती प्रतीक्षा संपली आहे.
Read Also ;
खडसेंनी ईडीची वाट बघू नये आधी सीडी पब्लिश करावी, खडसे-पाटील जुंपलीhttps://t.co/C5a5GPkhWn @EknathGKhadse @ChDadaPatil @CMOMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 23, 2020