मुंबई : शरद पवार हे अभ्यास नसलेले छोटे नेते असल्याची टीका पाटील यांनी केली होती. राजकारणात येण्यापूर्वी पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचं दिसून आलं. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका करतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तसेच विधान परिषदेच्या जागा जिंकण्यासाठी जे करता येईल ते करा, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यावर आता आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिल आहे.
मला पवार साहेबांचा अनादर करायचा नव्हता, तसा माझा हेतूही नव्हता असं स्पष्टीकरण आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिल आहे. आपल्या कोथरूडमधील निवासस्थानी त्यांनी एका पत्रकार परिषदेत वरील वक्तव्य केलं आहे.
बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला. दहा ते बारा लोकसभेच्या व दहा ते बारा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. देशाचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते एकदाही पराभूत झालेले नाहीत. चंद्रकांत पाटील यांनी काहीही न करता त्यांना एकदा नव्हे दोनदा केवढी मोठी संधी मिळाली होती. किती भाग्यवान आहेत ते.
परंतु या सगळ्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झालेला नाही. पाटील यांच्याकडे असणाऱ्या मंत्रिपदाचा त्यांनी काहीही उपयोग केला नाही. चंद्रकांत पाटील यांच्याकडे असणारे सार्वजनिक बांधकाम खाते आणि राज्यातील दोन नंबरचे पद माझ्याकडे असते तर मी काचेचे रस्ते केले असते, असा टोला मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.
Read Also :
विधानपरिषद निवडणूक: महाविकास आघाडीला मिळतील ७० टक्के मते- मंत्री जयंत पाटलांचं भाकीत
राज्यातील सत्ता गेल्याने चंद्रकांतदादा यांचे मानसिक संतुलन ढळले, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची टीका
‘त्यांचं वक्तव्य एकूण मला ‘या’ मित्राची आठवण झाली’, रोहित पवारांनी उडवली चंद्रकांतदादांची खिल्ली
…तर मुंबई महापालिकेत आरपीआयचा उपमहापौर : मंत्री रामदास आठवले
‘शेतातल्या ढेकळाने स्वतःची तुलना हिमालयाशी करू नये’, अमोल कोल्हेंचा चंद्रकांतदादांना टोला
‘पुणेकरांनो काळजी घ्या’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन