मुंबई : येत्या 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी केली जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मिशन मुंबईचा’ नारा देत मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा चंग बाधला आहे. त्यानतंर आता रिपब्लिकन पक्षाने मुंबई महापालिकेवर पक्षाचा उपमहापौर बसवण्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.
त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रंगत पाहायला मिळणार आहे. जर येत्या काळात भाजप स्वबळावर लढणार असली, तर आमचे भाजपला समर्थन असेल. भाजप आणि आरपीआय मिळून शिवसेनेला महापालिकेपासून दूर ठेवू, असेही आठवले यावेळी म्हणाले. तसेच या पार्श्वभूमीवर येत्या काळात मी लवकरच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप मोर्चेबांधणी
नुकतीच मुंबईत भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक पार पडली . यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपवून भाजपने निवडणुकीचं बिगूल फुंकलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचं सांगून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. महापालिका निवडणुकीसाठी बुथ स्तरापासून बांधणी करा. राजकारणाचा अभ्यास असलेल्या तरुणांकडे वॉर्डांची जबाबदारी सोपवा, अशा सूचनाही फडणवीसांनी केल्या.
आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. 2022 साली मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार आहे. राजाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो, तसा काहींचा जीव महापालिकेत अडकलेला असल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचं नाव न घेता लगावला.
Read Also :
…तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही
‘पुणेकरांनो काळजी घ्या’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन
महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ, देवेंद्र फडणवीसांनी डागली टीकेची तोफ
मुंबई महापालिका निवडणूक : आघाडीतील ‘हा’ पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता!