पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे. शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये, अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हे यांनी चंद्रकांतदादांवर हल्ला चढवला आहे.
पुणे पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थित पिंपरी-चिंचवडमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अमोल कोल्हे यांनी ही घणाघाती टीका केली. काल भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. मला भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करायची नाही. पण शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये, अशी टीका करतानाच तुम्ही निखारा टाकला तर आम्ही वणवा पेटवू, असा इशारा कोल्हे यांनी दिला. देशात त्यांचा वरचष्मा आहे असं त्यांना वाटतंय. त्यामुळे त्यांना आता इंगा दाखवण्याची वेळ आली आहे, असंही ते म्हणाले.
शरद पवार हे अभ्यास नसलेले छोटे नेते असल्याची टीका पाटील यांनी केली होती. राजकारणात येण्यापूर्वी पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचं दिसून आलं. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका करतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते आहेत, असं पाटील म्हणाले होते. तसेच विधान परिषदेच्या जागा जिंकण्यासाठी जे करता येईल ते करा, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यावर खासदार कोल्हे यांनी पलटवार केला आहे.
Read Also :
‘पुणेकरांनो काळजी घ्या’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन
महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ, देवेंद्र फडणवीसांनी डागली टीकेची तोफ
मुंबई महापालिका निवडणूक : आघाडीतील ‘हा’ पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता!
पाठीत खंजीर खुपसण्यासारख्या गोष्टी आमच्या पक्षात नाही, ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीला टोला
…तर एकाही मंत्र्याला जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही, बोंडअळीच्या प्रश्नावरुन भाजप आक्रमक