मुंबई : मागील काही वर्षाची वक्तव्ये काढलीत तर हा माणूस सगळ्यांना आरे तुरे करतोय, यामध्ये नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अशा सगळ्यांना आरे तु रे ची भाषा वापरली आहे. तुमच्या मागच्या काळातील सगळ्या बोगस कंपन्या बाहेर काढतो, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा एकेरी उल्लेख कर जोरदार शब्दात कडक इशारा दिला आहे. त्यावर आता नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अनिल देशमुखांप्रमाणे नवाब मलिक तुरूंगातून बाहेर केव्हा येणार? कार्यकर्त्यांची प्रतिक्षा आणखी वाढली
संजय राऊत हा पळपुटा आहे म्हणून तो असं बोलतोय, कोण आहे हो संजय राऊत, तुम्ही नाव घेता कोण आहे. त्याचा पक्ष एवढा आहे, असं म्हणताना त्यांनी हाताच्या बोटांचा छोटासा भाग दाखविला. माझ्याकडं कात्रण आहेत. मी असा वाचून विसरणारा नाही. दखल घेणारा आहे. वाईट स्वभाव आहे माझा. वाक्य न वाक्य वाचतो, 26 डिसेंबरला अग्रलेख मी राखून ठेवला. संजय राऊतला सोडणार नाही. मी पण त्याच्यावर केस टाकेन. 100 दिवस तो आतमध्ये राहिला. त्याला वाटलं असेल कमी झाले आणखी जावं. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“माझा डोळा विरोधी पक्षावर नाही तर त्या चंद्रशेखर बावनकुळेंवर “; भुजबळांनी दिला हा इशारा
मी परत सांगतो, मी कालपर्यंत गप्प होतो, त्यामुळे नारायण राणे तु माझ्या नादाला लागू नकोस, आज तु मर्यादा सोडलेली आहे. तुझ्यासारखे 56 आलेत अन् गेलेत. नामर्द माणूस आहेस, म्हणून ईडी आणि सीबीआयच्या भीतीने तु पळून गेलास. असं म्हणत संजय राऊतांनी नारायण राणेंवर मागचा पुढचा सर्व संताप व्यक्त करत समाचार घेतला.
Read also
- राष्ट्रवादीचा भाजपला दणका, स्वराज्यरक्षक संभाजी महाराज नावाचे 10 हजार स्टिकर अजित पवारांच्या हस्ते प्रकाशन
- “त्यांनी मला विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे….;” बच्चू कडूंचा राज्य सरकारला घरचा आहेर
- “तो बोलत राहिला तर त्याला पुर्ण नागडा करीन”; संजय राऊतांचा नारायण राणेंवर संताप
- “राज्याला उर्फीमध्ये अडकडवून, योगी महाराष्ट्रात येऊन बर्फी घेऊन गेले”
- “नारायण राणे तु माझ्या नादाला लागू नकोस”, ऐकरी उल्लेख करत मागचा पुढचा सर्व संताप राऊतांनी राणेंवर काढला