मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम यांच्या व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेत मोठं वादळ निर्माण झालं होतं. या घटनेनंतर रामदास कदम हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातही उपस्थित नव्हते, तब्येतीचं कारण सांगत रामदास कदम दसरा मेळाव्याला अनुपस्थित राहिले होते. मात्र, आता रामदास कदम हे शक्तीस्थळावर बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी आले आणि त्यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली. लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
“वेडे लोक बरळत असतात, ते कोणत्या नशेत बरळतात याचा एनसीबीने तपास करावा”
रामदास कदम म्हणाले, मराठी माणूस ताठ मानेने जगतोय तो बाळासाहेबांमुळेच. आमच्यासारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांना बाळासाहेबांनी मोठे केले. मी कडवा शिवसैनिक आहे. शेवटपर्यंत भगव्याशी बेईमानी करणार नाही. मी पत्रकार परिषद गेऊन अनेक गोष्टींचा खुलासा करणार आहे, गौप्यस्फोट करणार आहे.
..तर पुण्यातील येरवडा इस्पितळात तुम्हाला दाखल करावं लागेल; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
अनिल परब आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या विरोधातील पुरावे शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी त्यांचे पीए प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिल्याचा आरोप माजी आमदार संजय कदम यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली. दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम आणि मनसेचे राज्य सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी खेडमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ऑडिओ क्लिपसह पुरावे सादर केले होते.
शिवसेना नेते संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला; राजकारणापलीकडची भेट?
रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील रिसॉर्ट आणि बंगल्याची माहिती शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी त्यांचे पीए प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केला होता. कदम यांनी प्रसाद कर्वे, रामदास कदम यांचे आणि किरीट सोमय्या यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग देखील माध्यमांसमोर सादर केले होते.
Read Also :
- हिंसाचार प्रकरणी मालेगावात रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांचा छापा; महत्वाचा दस्तावेज ताब्यात
- कारवाईच्या भीतीने बुलढाण्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
- “विक्रम गोखले कोण? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची गरज नाही”
- कोई नाचनेवाली बोलती है तो मै उसपर उत्तर नही देना चाहता; मंत्री विजय वडेट्टीवार कंगनावर संतापले
- समीर वानखेडे हिंदू की मुस्लिम? उद्या होणार फैसला..