मालेगांव : त्रिपुरात झालेल्या मशिदीच्या कथित विटंबनाप्रकरणी मालेगावात बंद पुकारलेल्या रझा अकादमीच्या संघटनेच्या कार्यालयावर पोलिसांनी रात्री छापेमारी केली आहे. या छापेमारीत पोलिसांनी झाडाझडती घेत काही महत्वाची पत्रक आणि दस्तावेज ताब्यात घेतले आहेत. रझा अकॅडमीतर्फे पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान शहरात नवीन बसस्थानक परिसरात जुना आग्रा रोड वर दगडफेक जाळपोळ सार्वजनिक तसेच खाजगी मालमत्तांची नासधूस करण्याचे प्रकार घडले होते. पोलिसांवर तुफान दगडफेक केल्याने तीन अधिकाऱ्यांसह सात पोलीस कर्मचारी व तीन सामाजिक कार्यकर्ते गंभीररित्या जखमी झाले होते.
“वेडे लोक बरळत असतात, ते कोणत्या नशेत बरळतात याचा एनसीबीने तपास करावा”
मालेगाव बंदला लागलेले हिंसक वळण तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काल भाजप नेते अशिष शेलार यांनी भेट देत तिथे बैठक झाल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर मालेगावी पोलिसांनी रझा अकादमीच्या लले चौकातील कार्यालयावर रात्री छापा मारून पंचसमक्ष कार्यालयाचे कुलूप जबाबदार पदाधिकारी न आल्याने तोडण्यात घेऊन झडती सत्र राबवले गेले. पोलीस उपाधीक्षक लता दोंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांना काही पत्रके संगणक व दस्तऐवज मिळून आल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
..तर पुण्यातील येरवडा इस्पितळात तुम्हाला दाखल करावं लागेल; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी धार्मिक संघटना व राजकीय पदाधिकाऱ्यांना पोलिसांतर्फे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप पत्रकारांशी वार्तालाप करताना केला होता. मात्र पोलिसांनी काल रात्री थेट रझा अकॅडमीच्या कार्यालयावर छापा मारत आपली कारवाई सुरूच ठेवली आहे. मालेगाव दंगल सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान , प्राणघातक हल्ले,जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न या संबंधी दाखल गुन्ह्यात पुरावे तपासून पोलिसांतर्फे अटकेची कारवाई केली जात आहे. कुणावरही आकस ठेवून कारवाई करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्पष्टीकरण अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे. रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकत केलेली कारवाई कुठलाही दबाव नसल्याचे संकेत देणारी ठरली आहे.
Read Also :
- कारवाईच्या भीतीने बुलढाण्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
- “विक्रम गोखले कोण? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची गरज नाही”
- कोई नाचनेवाली बोलती है तो मै उसपर उत्तर नही देना चाहता; मंत्री विजय वडेट्टीवार कंगनावर संतापले
- समीर वानखेडे हिंदू की मुस्लिम? उद्या होणार फैसला..
- शिवसेना नेते संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला; राजकारणापलीकडची भेट?