मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला. राऊत यांची अवस्था कोण होतास तू…काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू…अशी झाल्याची टीका त्यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर संजय राऊत यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस वेड्यांच्या इस्पितळात दाखल करावे लगे अशी बोचरी टाके संजय राऊत यांनी केली आहे.
काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये जुंपली; भाई जगतापांची थेट सोनिया गांधीकडे तक्रार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत कोण होतास तू काय झालास तू… असं म्हणत संजय राऊतांना टोला लगावला. त्यावरून राऊत यांनी पलटवार केला आहे. ते खूप जूनी ऐकतात. त्यांना भरपूर वेळ आहे. आम्ही कोण आहोत हे सर्वांना माहीत आहे. तुम्ही काय होतात… तुमची काय अवस्था झाली हे सर्वांना माहीत आहे. ही अवस्था अशीच राहिली तर पुण्यताील येरवडा इस्पितळात तुम्हाला दाखल करण्याची वेळ शकेल. अशी वेळ येऊ नये ही प्रार्थना करतो. निराशाचं अजीर्ण झालं तर असं होतं. फ्रस्टेशन आहे. निराशा आहे. जेव्हा निराशा प्रमाणबाहेर जाते तेव्हा अशी विधान येतात, असा चिमटा त्यांनी काढला.
सत्तेचा माज चढला असेल तर सरकारमधून बाहेर पडा; राष्ट्रवादीच्या नेत्याने नाना पटोलेंना ठणकावलं
काय म्हणाले होते फडणवीस ?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्रिपुरात खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार सुरू असल्याचा उल्लेख होता. त्यानंतर लगेच दोन दिवसांमध्ये 11 नोव्हेंबर रोजी मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मोर्चे निघाले, असा दावा त्यांनी केला. कुणाच्या ध्यानीमनी नसता इतके मोठे मोर्चे कसे काय निघतात? नियोजनाशिवाय हे मोर्चे निघणे शक्यच नाही. नियोजन झाले असेल तर सरकार, आयबी, गुप्तचर, पोलिसांनी कसे काय माहित नाही, असा सवाल त्यांनी केला. सरकारच्या समर्थनाने हे मोर्चे निघाले. हा पद्धशीरपणे पोलरयाझेशनचा प्रयोग आहे. या मोर्चामध्ये निवडून हिंदूंची दुकाने जाळली गेली. दुकान कुणाचेही जाळणे ते चुकीचेच. मात्र, या साऱ्या हिंसाचारावर महाविकास आघाडींच्या नेत्यांची तोंडे शिवली गेली. त्यात संजय राऊतांची अवस्था कोण होतास तू… काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू…अशी झाल्याची जहरी टीका फडणवीस यांनी केली.
Read Also :
- “वेडे लोक बरळत असतात, ते कोणत्या नशेत बरळतात याचा एनसीबीने तपास करावा”
- विमानातील प्रवाशासाठी भागवत कराड ठरले देवदूत; पंतप्रधान मोदींनी केलं तोंडभरून कौतुक
- काँग्रेसला मोठा धक्का: माजी विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादीच्या गळाला, पवारांच्या उपस्थितीत प्रवेश
- संपकरी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी; वाहतूक नियंत्रकाच्या डोक्यातच घातला दगड