बुलढाणा : राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही कोणताही तोडगा निघालेला नाहीये. महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांना सेवेत हजर राहण्याचे वारंवार आवाहन केलं मात्र, संपकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यातच एसटी महामंडळाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली आहे. याच निलंबनाच्या कारवाईच्या भीतीने एका संपकरी कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे.
नांदेडमध्ये हिंसाचाराप्रकरणी ५० जणांना अटक; रझा अकादमीच्या आयोजकांसह ४०० जणांवर गुन्हे दाखल
बुलढाणा जिल्ह्यात संपावर असलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कुठलाच तोडगा निघत नाहीये. त्यातच सरकार एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करत आहे. त्यामुळे आपलेही निलंबन होईल या भीतीने खामगाव आगारात सहाय्यक तांत्रिक पदावर कार्यरत असलेल्या विशाल याने टोकाचं पाऊल उचलत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
“वेडे लोक बरळत असतात, ते कोणत्या नशेत बरळतात याचा एनसीबीने तपास करावा”
या घटनेमुळे बुलडाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करायच्या का ? असा सवाल एसटी कर्मचारी विचारत आहेत.
Read Also :
- “विक्रम गोखले कोण? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची गरज नाही”
- कोई नाचनेवाली बोलती है तो मै उसपर उत्तर नही देना चाहता; मंत्री विजय वडेट्टीवार कंगनावर संतापले
- समीर वानखेडे हिंदू की मुस्लिम? उद्या होणार फैसला..
- शिवसेना नेते संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला; राजकारणापलीकडची भेट?
- ..तर पुण्यातील येरवडा इस्पितळात तुम्हाला दाखल करावं लागेल; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार