मुंबई : काल एका पत्रकार परिषद घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘कोल्हापुरातील कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा मी तिथून निवडून येईल’ असं वक्तव्य करताना ‘जनतेतील आमदार’ हि ओळख बनवण्याचा प्रयत्न केला होता.
आता जर चंद्रकांत पाटील ‘कोल्हापुरा’तून निवडूनच येणार होते तर पुण्यात येऊन ‘मेधा कुलकर्णीं’ना का डावललं? असा सवाल अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित करत चंद्रकांत पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. काल चंद्रकांतदादा पाटील विरुद्ध मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात वाकयुद्ध रंगलं होत, आता त्यात छगन भुजबळ यांनी उडी घेत चंद्रकांत पाटलांना धारेवर धरलं आहे.
चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून जिंकली. पण त्यावेळी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा राजकीय बळी देण्यात आला होता.
त्यावेळी भाजप आणि चंद्रकांत पाटलांवर ‘बाहेरील व्यक्ती’ म्हणून जोरदार टीका झाली होती. निवडणुकीनंतर मेधा कुलकर्णींनी अनेक व्यासपीठावरून आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. मला वरिष्ठांकडून पुण्यात लढण्याचे आदेश होते, तसहि मी कोल्हापुरातून कुठल्याही मतदारसंघातून निवडून आलो असतो, पण वरिष्ठांचा आदेश पाळावा लागतो असं त्यांनी काल म्हटलं होत.
दरम्यान भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता माजी मंत्री भाजपचे तारणहार गिरीश महाजन यांना मोठा धक्का दिला आहे. जामनेर तालूक्यातील जवळपास २०० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.
भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्यापासून उत्तर महाराष्ट्रात अनेक भाजपचे जुने निष्ठावान कार्यकर्ते, खडसे समर्थक राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. आता या पक्षांतराने माजी मंत्री गिरीश महाजनांना मोठा धक्का बसल्याच मानलं जात आहे. पक्षप्रवेश केलेल्या लोकांसोबत राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी ट्विटरवर फोटो शेयर केले आहेत.
Read Also :
एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांना ‘दे धक्का’ दोनशे ‘महाजन’ समर्थकांचा ‘राष्ट्रवादी प्रवेश’
देवाने कोकणाला अशा मूर्खांपासून वाचवावे, नितेश राणेंची खासदार विनायक राऊत यांच्यावर बोचरी टीका
मुंबई मेट्रो प्रकल्पात केंद्र सरकार खोडा घालत आहे: संजय राऊत
..मग शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून का पुढाकार घेतला नाही ; राजू शेट्टींची टीका