लखनऊ : उत्तरप्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. भारतीय जनता पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात मोठी लढाई बघायला मिळणार आहे. निवडणुकीचा चौथा टप्पा नुकताच पार पडला आहे. यामध्ये काही ठिकाणी समाजवादी पक्ष जोरदार मुसंडी मारण्याच्या तयारी करत आहे तर दुसरीकडं महाराष्ट्रातील भाजपचा एकेकाळचा साथीदार शिवसेना देखील पूर्ण ताकदीने भाजपला धुळीस मिळवण्यासाठी मैदानात उतरला आहे.
ईडीपासून काळजी घ्या, एवढा अहंकार बरा नव्हे; राजू शेट्टींचा अजित पवारांना गंभीर इशारा
शिवसेना राज्याबाहेर देखील आपली ताकद अजमावत आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे आता उत्तरप्रदेशात ठाण मांडून बसले आहे. शिवसेना भाजपचे मतदान खाण्याचे काम करून त्यांना अडचणीत आण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. कालच शिवसेनेने उत्तर प्रदेशात गर्जना केली आहे की आजी मुख्यमंत्री हे लवकरच माजी मुख्यमंत्री होणार आहेत. आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर पहिल्यांदाच टीका केली आहे.
किरीट सोमय्यांकडून महाविकास आघाडीच्या ‘डर्टी डझन’ मंत्र्यांची लिस्ट जाहीर
दुसरीकडं एकनाथ शिंदे देखील तितक्याच आक्रमकतेने प्रचार आणि भाषणे करत आहेत. नारी के सन्मान मै, शिवसेना मैदान मै ‘ ही घोषणा घेऊन उत्तरप्रदेश राज्यातील कोरांँव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार श्रीमती.आरती कोल यांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदेनी सुरुवात केली आहे. श्रीमती आरती कोल याच आपल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी योग्य उमेदवार असून येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन एकनाथ शिंदेनी उपस्थित कोराँवकर मतदार बंधू भगिनींना संबोधित करताना केले.
Read also:
- शिवसेनेला अजून एक मोठा धक्का! यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागाचा छापा
- संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीचा दणका
- मुख्यमंत्री सहा महिन्यांपासुन बेपत्ता, आता मंत्री देखील कुणाला सापडणार नाहीत – चंद्रकांत पाटील
- आता सरकार स्वतः बरखास्त होऊन राष्ट्रपती राजवट लागू होईल – आमदार रवी राणा
- उत्तर प्रदेशमधील प्रचारसभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकार जोरदार हल्ला ; म्हणाले…;