पुणे : दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याचा कारभारी कोण होणार ? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. बापटांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झालीय, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. यातच पुण्याचा खासदार होण्यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांचे पोस्टर, बॅनर देखील झळकले आहेत. यातच आता काॅंग्रेसचे पुणे शहाराध्यक्ष अरविंद शिंदे यांचेही भावी खासदार म्हणून प्लेक्स लागले आहेत.
हेही वाचा…धुळ्यात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन ; कार्यकर्ते आक्रमक, जोरदार घोषणाबाजी
भावी खासदार म्हणून पुण्यात पुन्हा एकदा काॅंग्रेस नेत्याचे बॅनर लागले आहेत. पुणे शहाराचे काॅंग्रेसचे शहाराध्यक्ष अरविंद शिंदे यांचे प्लेक्स पुण्याच्या मध्यवर्ती भागात लागले आहेत. याआधी भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक, मनसेचे नेते वसंत मोरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांचेही भावी खासदार म्हणून बॅनर्स लागले होते. भाजप पाठोपाट पुणे लोकसभा हा काॅंग्रेसचाही बालेकिल्ला राहिला आहे. यासाठी आता काॅंग्रेसचे वरिष्ठ आणि केंद्रातील नेते पुणे दौरा करणार आहेत.
हेही वाचा…काँग्रेसच्या जागावाटपाबाबत मोठी बातमी ; दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या
दरम्यान, अलिकडेच झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत काॅंग्रेसने भाजपचा बालेकिल्ला उद्धवस्त केलाय. भाजपचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांचा रविंद्र धंगेकर यांनी पराभव केला होता. त्यामुळे पुण्यात काॅंग्रेस पुन्हा एकदा जिवंत झाली आहे. त्याचाच भाग म्हणून महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेची जागा काॅंग्रेसला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी काॅंग्रेसने वेगाने राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा..आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, वरळीतील माजी नरसेविकाचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
हेही वाचा…“तर गृहमंत्र्यांनी ‘या’ महाशयांवर कठोर कारवाई करा,” रूपाली चाकणकरांची आव्हाडांवर खोचक टिका
हेही वाचा..राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेचा संपुर्ण वेळापत्रक, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातून जाणार यात्रा
हेही वाचा…“‘ती’ संधी आता आम्ही सोडणार नाही”, अमोल कोल्हेंचं मोठं विधान