पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अधिसभा (सिनेट) निवडणुकीत भाजप आणि अभाविप प्रणित विद्यापीठ विकास मंचच्या उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मात दिली आहे. प्रत्यक्ष मतदान झालेल्या दहा पैकी नऊ जागेवर विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार विजयी झाले आहेत. सिनेट निवडणुकीत यंदा राजकीय चुरस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली.
गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना सुट्टी..! सुट्टी का ? सेनेचा सवाल
राज्यातील राजकारणाचे पडसाद येथेही उमटल्याने महाविकास आघाडी तसेच भाजपने जोर लावला होता. नऊ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असले तरी एक जागा मात्र त्यांना गमवावी लागली. खुल्या गटातून शिवसेनेचे उमेदवार बाकेराव बस्ते विजयी झाले.
‘टिकली’ प्रकरणावर भिडेंनी महिला आयोगाकडे मागितला 10 दिवसांचा वेळ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महाविकास आघाडीसह ही निवडणूक लढवली. या पहिल्याच प्रयत्नात महाविकास आघाडीचे एक शिलेदार सिनेटमध्ये निवडून गेले आहेत. ज्या संस्थेत एका वेगळ्या विचाराच्या लोकांचा प्रभाव आहे अशा संस्थेत महाविकास आघाडीचा प्रवेश झाला असून यापुढील काळात विद्यार्थ्यांचे हितासाठी एक हक्काचे सिनेट सदस्य विद्यार्थ्यांना मिळाले आहेत.
विजयी उमेदवार भाजप
१) प्रसेनजित श्रीकृष्णा फडणवीस
२) सागर अनिल वैद्य
३) युवराज माधवराव नरवडे
४) दादाभाऊ भिकाजी शिनलकर
५) बाकेराव बस्ते ( शिवसेना ठाकरे गट)
SC प्रवर्ग
राहुल शिवाजी पाखरे
DTNT प्रवर्ग
विजय निवृती सोनवने
OBC प्रवर्ग
सचिन शिवाजी गोर्डे
ST प्रवर्ग
गणपत पोपट नांगरे
महिला गट
बागेश्री मिंलीद मंठाळकर
Read also
- “आंबेडकरवादी सुषमा अंधारेंनी बाळासाहेबांचे प्रखर हिंदूत्व स्वीकारलं का ?” शिंदे गटातील आमदाराचा सवाल
- महापालिकांच्या निवडणुकांचा बिगूल लवकरच वाजणार…! प्रभाग रचनेचा आयुक्तांना आदेश
- “येणाऱ्या काळात या सरकारला जनता घालवल्याशिवाय राहणार नाही”
- “राहुल गांधींचा महाराष्ट्रातील जनतेसाठी खास संदेश”; म्हणाले, ‘या भूमीत…’
- “हा मला मुख्यमंत्र्यांनी 900 खोके दिलेत”; बंडखोर आमदार प्रताप सरनाईक