मुंबई : लस उत्पादक कंपनी सीरम इंस्टिट्यूच्या पुण्यातील एका इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत दुर्देवाने 5 मजूरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आता या घटनेवरून राजकारण सुरू झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच लसीबाबत माहिती घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सीरम इंस्टिट्यूटला भेट दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या इमारतीला भेट दिली. त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. आता यावरून काँग्रेसने अप्रत्यक्षरित्या मोदींवर निशाणा साधला आहे.
सिरम इन्स्टिट्यूट ला आग लागली..!!
जिथे जाऊन येतात तिथे आगच लावतात..!!
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) January 21, 2021
जिथे जाऊन येतात तिथे आगच लावतात, अशा शब्दात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी अप्रत्यक्षपणे थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, भाजप नेत्या मुक्ता टिळक यांनी सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीमागे घातपाताची शंका येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आग लागली की लावली? असा सवाल केला आहे.
Read Also :
- ‘मित्रा, तुला विसरणं आणि दुःख पचवणं कठीण आहे’, धनंजय मुंडे झाले भावूक
- मृतांच्या कुटुंबियांसाठी पुनावालांचा मदतीचा हात, देणार ‘इतके’ लाख
- ‘मला जर संधी मिळाली तर…’ काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेविषयी नाना पटोलेंची प्रतिक्रिया
- उद्धव ठाकरे, शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार
- पहाटेच्या सरकारचे खरे सूत्रधार शरद पवारच – देवेंद्र फडणवीस