मुंबई : गेली काही दिवसांपासून राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा सुरू आहेत. या पदासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत असून, यात विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, सुनील केदार, यशोमती ठाकूर व नाना पटोले यांचा समावेश आहे.
तर दुसरीकडे नाना पटोले यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. आता या चर्चांविषयी नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनीच लवकरच नवीन भूमिका स्विकारण्याचे संकेत दिले आहेत.
सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेत बदल हे चालतच राहतात. मला जर संधी मिळाली तर वेगळ्या भूमिकेत मी पुढे जाईन आणि तुमच्याकडे येईनही, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी नवीन पदाविषयी संकेत दिले आहेत.
दरम्यान, याआधी राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी ‘काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद विदर्भातील मंत्र्याला मिळावं’ अशी मागणी हायकमांडकडे केली होती.
Read Also :
- उद्धव ठाकरे, शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार
- पहाटेच्या सरकारचे खरे सूत्रधार शरद पवारच – देवेंद्र फडणवीस
- ‘मतांच्या चिंतेमुळेच शिवसेनेने ‘नामांतरा’चा सामना सुरू केला’, थोरातांचे जोरदार उत्तर
- ‘तथाकथित पत्रकार पंतप्रधान कार्यालयाचा खेळण्याप्रमाणे वापर करत आहे’
- ‘… आता बुटांनी हिशोब होईल’, तांडववरून राम कदम आक्रमक