मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे सध्या बलात्काराच्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. आपल्यावरील सर्व आरोप मुंडे यांनी फेटाळले असले, तरी विरोधक मात्र यावरून आक्रमक झालेले आहे. या आरोपानंतरही मुंडेंनी जनता दरबाराचे आयोजन केले होते. आता आपल्या जून्या मित्राच्या निधनाच्या वृत्ताने ते भावूक झालेले पाहण्यास मिळाले.
धनंजय मुंडे यांच्या अनंता नावाच्या सिम्बायोसिस कॉलेजमध्ये शिकत असतानाच्या मित्राचे निधन झाले आहे. मुंडे यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुला विसरणं आणि हे दुःख पचवणं खरंच खूप कठीण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अनंता… मित्रा….सिम्बायोसिस कॉलेजमध्ये शिकायला गेलो तेव्हा पहिल्या लेक्चरला भेटलेला पहिला मित्र तू. तरुण वयात अनेक आठवणी मागे ठेऊन अचानक आमच्यातुन निघून गेलास . अनंता तुला विसरणं आणि हे दुःख पचवणं खरंच खूप कठीण आहे रे… तू याद बहुत आयेगा तो मै क्या करुंगा…?, असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
मी अनंत पाटील यांचे आई-वडील, पत्नी आणि सर्व कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. तरुण वयात घरातील कर्ता व्यक्ती गेल्याचे दुःख पचवण्याची शक्ती त्यांना देवो, हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना… अँड अनंत पाटील यांस भावपूर्ण श्रद्धांजली. या कुटुंबाशी जवळीकता आणि बांधिलकी कायम राहील, असेही ते म्हणाले.
Read Also :
- मृतांच्या कुटुंबियांसाठी पुनावालांचा मदतीचा हात, देणार ‘इतके’ लाख
- ‘मला जर संधी मिळाली तर…’ काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेविषयी नाना पटोलेंची प्रतिक्रिया
- उद्धव ठाकरे, शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार
- पहाटेच्या सरकारचे खरे सूत्रधार शरद पवारच – देवेंद्र फडणवीस
- ‘मतांच्या चिंतेमुळेच शिवसेनेने ‘नामांतरा’चा सामना सुरू केला’, थोरातांचे जोरदार उत्तर