पुणे : पुण्यातील मांजरी येथील सीरम इन्स्टिट्युट मधील निर्माणाधीन इमारतीत आग लागल्याची घटना समोर आली होती. अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले होते. मात्र दुर्देवाने यात 5 मजूरांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. या मृतांच्या नातेवाईकांसाठी आता सीरम इंस्टिट्यूटने मदतीचा हात पुढे केला आहे.
आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाखांची मदत ‘सीरम इन्स्टिट्यूट’कडून जाहीर करण्यात आली आहे. याबाबत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सायरस एस. पूनावाला यांनी माहिती दिली आहे.
सीरम इन्स्टिट्युटमध्ये सहा मजली नवीन इमारतीचे काम सुरू असून याच इमारतीत आगीचा भडका उडाला. या आगीवर 4 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते.
सीरम इन्स्टिट्यूटसाठी आजचा दिवस अतिशय दु:खद आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. कंपनीच्या निर्धारित नियमांच्या पलिकडे जाऊन दुर्घटनेतील मृत्यूमुखींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर करत आहोत, असे सायरस पुनावाला म्हणाले.
दरम्यान, आग आटोक्यात आल्यानंतर ज्या मजल्यावर सर्वप्रथम आग लागली होती तिथेच एका खोलीत पुन्हा आग लागल्याचे समोर आले होते. मात्र वेळातच आग आटोक्यात आणली गेली.
Read Also :
- ‘मला जर संधी मिळाली तर…’ काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेविषयी नाना पटोलेंची प्रतिक्रिया
- उद्धव ठाकरे, शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार
- पहाटेच्या सरकारचे खरे सूत्रधार शरद पवारच – देवेंद्र फडणवीस
- ‘मतांच्या चिंतेमुळेच शिवसेनेने ‘नामांतरा’चा सामना सुरू केला’, थोरातांचे जोरदार उत्तर
- ‘तथाकथित पत्रकार पंतप्रधान कार्यालयाचा खेळण्याप्रमाणे वापर करत आहे’