लखनऊ : उत्तर प्रदेशातील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी एक अजब विधान केलं आहे. त्यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना औरंगजेबाची तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली आहे. ही तुलना करताना त्यांनी ओवैसींवर वादग्रस्त शब्दात टीकाही केली.
राज्यपालांवर बंदूक ठेवून भाजपा महाराष्ट्रात राजकारण करत आहे – नाना पटोले
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ हे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आहेत ज्यांनी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्यासारख्या आधुनिक औरंगजेबाचा खात्मा करण्यासाठी अवतार घेतला आहे, असं सिंह यांनी म्हटलं आहे. ओवैसी हे औरंगजेबाचे अपत्य असून ते देशात फूट पाडण्याचं काम करत आहेत. तसेच सध्याच्या भारतात ते मुहम्मद अली जीना याचं प्रतिनिधीत्व करत आहेत,” असंही सिंह यांनी म्हटलं आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.
मुंबै बँकेवर प्रविण दरेकरांचा झेंडा; सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर विजय
सिंह यांनी यापूर्वीही ओवैसी यांच्यावर टीका करताना त्यांना ‘राजकीय दहशतवादी’ म्हटलं होतं. ओवैसी हे देशातील नागरिकांना भडकवण्याचं काम करत असून समाजात फूट पाडत आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, पीयूष जैन यांच्या घरावर इन्कम टॅक्सने टाकलेल्या छाप्यांवरून समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव यांच्यावर निशाणा साधत सुरेंद्र सिंह म्हणाले की, ज्या व्यक्तीवर छापा टाकण्यात आला तो सपा नेत्यांचा कुबेर होता.
Read also:
- आशिष शेलारांच्या खात्यात मोदींनी १५ लाख टाकले वाटतं?, सचिन सावंतांचा खोचक सवाल
- म्हाडा, एपीएससी परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी होणार दोन्ही परीक्षा
- ‘एका बँकेवर विजय मिळवून राज्यात सत्ताबदलाची बोंब मारणे म्हणजे भाकडकथा’; सामनातून नारायण राणेंना चिमटे
- पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही मिनी लॉकडाऊन? मंत्री विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं
- राज्यात पुन्हा लॉकडाउन? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत