मुंबई – भाजप आमदार आशिष शेलार यांच्या खात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ लाख टाकल्यामुळे त्यांच्यात प्रश्न विचारायला नैतिक धैर्य आलं असल्याचा खोचक टोला काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी लगावला आहे. मुंबई महानगरपालिका आणि महाविकास आघाडीकडून नागरिकांना ५००चौ.फु. घरांचा मालमत्ता कर माफ केला आहे. यावर आशिष शेलारांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. आतापासूनच नव्हे तर वचन दिलेत त्या तारखे पासून ५००चौ.फु. घरांचा मालमत्ता कर पूर्ण माफ करा असे शेलार यांनी म्हटलं आहे. तसेच पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबईकरांची आठवण झाली असल्याची टीका शेलारांनी केली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जातीवाद; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या आश्वासनांवर शेलारांनी वक्तव्य केलं आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना बिल्डरांना प्रिमियममध्ये ११ हजार कोटींची सुट दिली होती. पब बार आणि हॉटेल्सच्या लायसन्स फी मध्ये सवलत देण्यात आली आहे. मद्यावरील करात सुट देण्यात आली आहे. तसेच आता ज्यातारखेला वचन दिले आहे तेव्हापासून ५०० चौ.फु घरांचा मालमत्ता कर माफ करा अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच ५०० चौ.फु पर्यंतच्या दुकानदारांनाही सुट देणारा का? असा सवाल आशिष शेलारांनी केला आहे.
राज्यपालांवर बंदूक ठेवून भाजपा महाराष्ट्रात राजकारण करत आहे – नाना पटोले
भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सावंत यांनी सवाल उपस्थित करत शेलारांना खोचक टोला लगावला आहे. ‘शेलारांच्या अकाऊंटमध्ये मोदींनी १५ लाख टाकले वाटते? असे प्रश्न विचारायला नैतिक धैर्य कदाचित त्यामुळेच आले असेल’ असे सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला १५ लाख रुपये खात्यात जमा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. यावरुन सचिन सावंत यांनी आशिष शेलारांना टोला लगावला आहे.
Read also:
- म्हाडा, एपीएससी परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी होणार दोन्ही परीक्षा
- ‘एका बँकेवर विजय मिळवून राज्यात सत्ताबदलाची बोंब मारणे म्हणजे भाकडकथा’; सामनातून नारायण राणेंना चिमटे
- पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही मिनी लॉकडाऊन? मंत्री विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं
- राज्यात पुन्हा लॉकडाउन? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत
- मुंबै बँकेवर प्रविण दरेकरांचा झेंडा; सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर विजय