पुणे : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय नेत्यांकडून कसून प्रचार केला जात आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी या पोटनिवडणुकांसाठी मतदान होत असून येत्या ०२ मार्चला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीसोबतच अपक्ष उमेदवारांनी देखील प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. यातच नेता म्हणून नव्हे तर बेटा म्हणून सेवा करणार असं म्हणत अपना वतन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार सिद्धिक शेख मैदानात उतरले आहेत.
हेही वाचा..“पोटनिवडणुकांमध्ये लोकांचा आशीर्वाद आम्हालाच मिळणार”, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
राजकारणात प्रत्येक जण नेता होण्यासाठी धडपडत असतो. निवडणुका लढविण्यामागेही अनेकांचा उद्देश नेता होण्याचाच असतो. मात्र मी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नेता होण्यासाठी नव्हे तर चिंचवडच्या तमाम मतदारांचा बेटा होऊन त्यांची सेवा करण्यासाठी उतरलो आहे, असं सिद्धिक शेख यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“युवराज पार्थ पवार यांच्यासाठी मावळ ‘सेफ’ करण्याची रणनिती”
अपना वतन संघटनेच्या माध्यमातून शहरातील विविध प्रश्नांवर अनोख्या पद्धतीने आंदोलने उभारण्यासाठी सिद्धिक शेख यांची ओळख झाली आहे. त्यांनी आजतागायत शहरातील कचऱ्याचा प्रश्न, टॅंकर माफिया, झोपडपट्टी धारकांचे प्रश्न, पिंपरी चिंचवड आयुक्तालयात शहारातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात केलेली आंदोलने, दलित अत्याचारविरोधातील आंदोलने, खिश्चन आणि मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी केलेली आंदोलने, अवैध वृक्षतोड, खाजगी शाळांमधील फी वाढ, नदी प्रदुषण, रूग्णालयासंदर्भात केलेली विविध आंदोलने चांगलीच गाजली.
हेही वाचा..मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून मला मारण्याची सुपारी, संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
दरम्यान, सिद्धिक शेख यांनी अनेक सामाजिक उपक्रम देखील आपल्या मतदार संघात राबविले आहेत. यामध्ये शहरातील विविध भागांमध्ये बेटी बचाव अभियान, मंदिर, सार्वजनिक पुतळे, मस्जिद परिसर अशा ठिकाणी स्वच्छता अभियान, प्रौढ साक्षरता अभियान, गुन्हेगारी मुक्त शहर अभियान, स्वच्छ व सुरक्षित शहर अभियान प्रबोधनकार शिबिरांचे आयोजन, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र दौरा, कलम ३५३ विरोधात शिबिरे आदि काम केले आहेत.
Read also
- हेही वाचा..सोसायटीधारकांसाठी भाजपाचे ‘रेड कार्पेट’ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘मायक्रो कॅम्पेनिंग’
- हेही वाचा…चंद्रकांत पाटलांचं पोटनिवडणुकांबाबत सूक्ष्म नियोजन, थेट घरात जाऊन रासनेंचा प्रचार
- हेही वाचा..“कसब्यात हेमंत रासनेंचा विजय निश्चित, उदयन राजेंचा मतदारांवर विश्वास”
- हेही वाचा..“तर अंबादास दावनेंचं विरोधी पक्षनेतेपद अडचणीत येऊ शकतं”
- हेही वाचा..“अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार असलेल्या शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली”