पुणे : चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उद्या भाजपचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. दुपारी बारा वाजता कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीकरीता हेमंत रासने तर चिंचवडसाठी अश्विनी जगताप आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. महाविकास आघाडीकडून अद्यापही आपला उमेदवार घोषीत केला नाही. त्यामुळे याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
“नाना भाऊ काॅंग्रेसमध्ये राहुन भाजपचं उघडपणे काम करताहेत,” राष्ट्रवादीचा नाना पटोलेंवर आरोप
चिंचवडमध्ये भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी आज मोराया गोस्वाई समाधीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात केली आहे. यातच त्यांनी राष्ट्रीय स्वंय संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेटीही घेतल्या आहे. तसेच त्यांचा पाठिंबा असल्याचंही अश्विनी जगताप यांनी सांगितलं. त्याचबरोबर आमदार लक्ष्मण जगताप यांचं राहिलेलं काम पुर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
“ठाकरेंच्या रिफायनरी विरोधामुळे कोकणाने 1 लाखांचा रोजगार गमावला,” फडणविसांचा गंभीर आरोप
दुसरीकडे आपने दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 9 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आप चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुक लढवण्यासाठी पक्ष सज्ज झाला आहे. आपचे प्रभारी गोपाळ इटालिया सध्या पुण्यात आहेत. त्यांच्याकडून पुण्यातील पदाधिकारी, नेते यांच्यात चर्चा झाली आहे. तेही आपला उमेदवार घोषीत करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कसबा मतदार संघ हा महाविकास आघाडीने काॅंग्रेसला सोडला आहे. त्यामुळे कसब्यातून काॅंग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर दुसरीकडे चिंचवडमधून मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून राहिलेले राहुल कलाटे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून नाना काटे, राजेंद्र जगताप, मोरेश्वर भोंडवे हे देखील पोटनिवडणुकीच्या शर्यतीत आहेत. याची घोषणा आज रात्री होण्याची शक्यता आहे.
Read also
- “हेमंत रासने उद्या कसब्यासाठी अर्ज सादर करणार,” महायुतीतील या पक्षातील नेत्यांनी दिला पाठिंबा
- “शरद पवार सर्वांचेच नेते, ते पोटनिवडणका बिनविरोध करतील, अशी आशा”
- “नव्या सरकारने 40 आमदारांना मंत्रीपदाचं गाजर दाखवलं,” अजित पवारांनी पुन्हा डिवचलं
- “मुख्यमंत्र्यांचा पटोलेंना फोन, तरीही कसब्यातून लढणार ;” नाना पटोलेंनी शड्डू ठोकला
- “नाराजी, खंत, तरीही आदेश मान्य, हेमंत रासनेंनी घेतली शैलश टिळकांची भेट”